25 June 2022 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
भाजपच्या सांगण्यावरून शिंदेंचा समर्थक आमदारांनाविरुद्धही गेम प्लॅन | सेनेतच असल्याचं सांगून भीषण प्लॅन रचला आहे Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
x

शोविक चक्रवर्तीच्या बँक खात्यात सुशांतच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा ईडीला संशय - सविस्तर वृत्त

Sushant Singh Rajput case, Rhea brother Showik Chakraborty, Rhea Chakraborty

मुंबई, ७ ऑगस्ट : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाने एक नवं वळण घेतलं आहे. सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तपासाच्या दुहेरी कचाट्यात सापडली आहे. सीबीयाकडून रिया चक्रवर्तीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून ईडीकडूनही रियाची चौकशी आज करण्यात येणार आहे. रिया चक्रवर्ती या चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यावरुन अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात येत होत्या. अशातच रिया चक्रवर्तीने चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली आहे. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर कोरोना होण्याच्या भितीमुळे रिया चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचं बोललं जात होतं.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सुरू केलेल्या चौकशीनंतर वेगळाच मुद्दा प्रकाशात येत आहे. प्रसार माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार रियाच्या भावाच्या बँक अकाउंटमध्ये संशयास्पद ट्रान्झॅक्शन झाल्याचं वृत्त आहे. त्यावरून शोविक चक्रवर्तीच्या खात्यात थेट सुशांतच्या खात्यातून मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्याचं प्राथमिक वृत्त समोर आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुशांतच्या खात्यातून थेट शौविकच्या खात्यात पैसे वळवण्यात आल्याच्या नोंदी आहेत. कोटक बँकेतून हे पैशाचे व्यवहार झाल्याचं या अकाउंट्सवरून स्पष्ट होतं. ईडीने रियाबरोबर तिचा भाऊ, वडील आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अभिनेत्रीला आज ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं. त्याबरोबर तिचा भाऊ शोविकचीही कसून चौकशी करण्यात आली. रियाबरोबर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती देखील चौकशी करता हजर होते. आज सुरू असलेल्या या ईडी चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान मिळालेल्या अधिक माहितीनुसार रियाच्या २ प्रॉपर्टीसंदर्भात तिची चौकशी केली जात आहे. त्याचप्रमाणे तिची बँक स्टेटमेंट, इनकम टॅक्स रिटर्न, उत्पन्नाचे साधन आणि बचत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

त्याचप्रमाणे सुशांत सिंह राजपूतने २०१९ ते जानेवारी २०२० या काळात 2 कंपन्या निर्माण केल्या, त्यामध्ये रियाचं योगदान काय त्याबाबत प्रश्न विचारले जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. रियाच्या 2 मालमत्तांची कागदपत्रं देखील ईडीकडून मागण्यात आले आहे. तिचे वडील आणि भाऊ ज्या २ कंपन्यांचे संचालक आहेत, त्याबाबत देखील काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. जवळपास ३ तासांहून अधिक काळ रियाची चौकशी अद्याप सुरू होती. दरम्यान तिचा भाऊ शौविक ईडी ऑफिसमधून बाहेर पडला आणि पुन्हा तासाभरात कपडे बदलून चौकशीसाठी ईडी ऑफिसमध्ये दाखल झाल्याचं वृत्त ANI ने दिलं.

 

News English Summary: Showik Chakraborty brother of actor Rhea Chakraborty, leaves Enforcement Directorate office. He is named in the FIR registered by CBI in Sushant Singh Rajput death case.

News English Title: Sushant Singh Rajput case bank statement of Rhea brother Showik Chakraborty reveals truth News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x