16 March 2025 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | मल्टिबॅगर पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक, किंमत ९ रुपये, यापूर्वी 401 टक्के परतावा दिला - NSE: RTNPOWER TATA Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टील शेअर मालामाल करणार, मोठी झेप घेणार - NSE: TATASTEEL Bima Sakhi Yojana l दहावी पास महिलांना दरमहा 7000 रुपये मिळणार, या खास सरकारी योजनेसाठी अर्ज करा Yes Bank Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीच्या खाली घसरणार येस बँक शेअर्स, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: YESBANK Gratuity Money l 90% पगारदारांना माहित नाही किती ग्रॅच्युइटी मिळते, इथे समजून घ्या आणि नुकसान टाळा EPFO Money Alert l खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, खात्यात EPF चे 1,17,82,799 रुपये जमा होणार Budh Vakri Rashifal l यापैकी तुमची राशी कोणती, बुधाची वक्री चाल 'या' राशींना प्रचंड लाभ मिळवून देणार
x

..तर भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून काँग्रेसला वेगळं करतील? सविस्तर वृत्त

NCP, Shivsena

मुंबई: आजच्या महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी त्यातुलनेत पूरक असली तरी भविष्यात थेट काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी इतर छोटे पक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष तसेच आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक आजही व्यक्त करतात. राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.

दुसरीकडे भाजपाला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही १,४१,९९,३८४ असून मतांची टक्केवारी २५.७५ इतकी आहे. याचा अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण मंतांची आकडेवारीही १ कोटी ८३ लाखाच्या घरात जाते, जी भाजपाला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा ३१ लाखाने अधिक आहे. उद्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र जरी आले तरी काँग्रेस-भाजप एकत्र येणे कदापि शक्य नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने वंचितला सोबत घेतल्यास ती काँग्रेससाठी राजकीय आत्महत्या ठरेल. तर भाजपकडे मनसे व्यतिरिक्त कोणताही पर्याय नसेल. मात्र त्याची शक्यता देखील फारच कमी आहे.

एकूणच शिवसेनेच्या राजकीय संयमाचा विचार केल्यास पूर्वी भाजपसोबत युतीत सर्वकाही झेलून निवडणूक संपेपर्यंत स्वतःचा राजकीय हेतू साध्य केला आणि नंतर स्वतःच्या फायद्याचा विचार करून वेगळा निर्णय घेतला. तोच सय्यम आज शिवसेना काँग्रेससोबत दाखवत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं. मात्र वेळ येताच शिवसेना तिथेही स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून काँग्रेसला योग्य वेळ आल्यावर बाजूला करेल असं सध्याचं चित्र आहे.

त्यात काँग्रेसचं केंद्रीय नैतृत्व महाराष्ट्रात प्रचाराला देखील फिरकत नसल्याने काँग्रेसचा प्रचार देखील फिका पडतो आणि उमेदवारांना सर्वकाही स्वतःच्या भरोशे करण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यास प्रचाराची मोठी यंत्रणा उपलब्ध असेल जी भाजपच्या तुलनेत देखील मोठी असेल. आजच्या घडीला भाजपची नकाराम्तक हवा असली तरी मोदी-शहांच्या भाजपने कोणतेही मोठे दिवे लावले नसून संपूर्ण कार्यकाळ केवळ इव्हेंट साजरे करून देशाच्या मूळ विषयांकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे धार्मिक राजकरण खेळण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय नसेल. त्यात दिल्ली निवडणुकीच्या निकालाने विकासाच्या मुद्यांना अधोरेखित केल्याने भाजप देखील धार्मिक राजकरण करताना द्विधा मनसःस्थितीत असेल यात शंका नाही.

त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढणारी जवळीक भविष्यातील राजकारणाचे संकेत देताना दिसत आहे. राज्यातील एकूणच बदलत्या राजकारणाचा विचार केल्यास भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविल्यास आश्चर्य वाटणार नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटतं आहे.

 

Web Title: Story Shivsena and NCP parties may make alliance during next Maharashtra Assembly Election.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x