27 April 2024 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

MESTA'चा खाजगी कार्यक्रम मनसेच्या माथी मारून चुकीची वृत्त प्रसिद्ध: सविस्तर वृत्त

Aurangabad, Sambhajinagar, MESTA Edu 2020, MNS Chief Raj Thackeray

औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असून नियोजित कार्यक्रम योग्य प्रकारे सुरु असताना हा दौरा फसलेला आहे हे दाखविण्यासाठी अनेक चुकीची वृत्त प्रसिद्ध होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेने देखील यामागील राजकीय कनेक्शन शोधणं गरजेचं आहे. हिंदुत्वाला जवळ केल्यानंतर सर्वाधिक पदाधिकारी औरंगाबादमधून मनसेत सामील झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये पायाभूत सुविधांचे विषय महत्वाचे असले तरी हिंदुत्व देखील तितकंच महत्वाचं आहे.

मात्र, राज ठाकरेंचा नियोजित औरंगाबाद दौरा सुरु झाल्यापासून त्याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत खातरजमा नं करता मनसे आणि राज ठाकरेंबद्दल चुकीची वृत्त प्रसिद्ध होतं आहेत. त्यातील पहिली चुकीची बातमी पसरली ती म्हणजे राज ठाकरे नियोजित दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. त्याबातमीनंतर मनसेच्या वरिष्ठ नेत्यांकडून वृत्त फेटाळताच, कोणतीही खातरजमा नं करता वृत्त प्रसिद्ध करणाऱ्यांचा तिळपापड झाल्याने पुन्हा संभ्रम वाढेल अशा चुकीच्या बातम्या पसरविण्यास सुरुवात झाली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पक्षातील लोकांना याबाबत कारणीभूत धरलं, मात्र तो तिर लागला चुकीचं वृत्त पसरवणाऱ्या वर्तमानपत्रांना तसेच टीव्ही वाहिन्यांना असंच म्हणावं लागेल. कारण त्यानंतर त्याही पलीकडील चुकीचं वृत्त प्रसिद्ध करून औरंगाबादच्या विषयावरून राज ठाकरेंना कोंडीत पकडणार वृत्त देऊन त्यांची राजकीय दृष्टीने कशी खिल्ली उडवता येईल याची दक्षता घेतली गेल्याच सदर वृत्तांमध्ये दिसतं आहे. वस्तविक मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जोरदारपणे पार पडला आणि त्याला राज ठाकरे यांनी मार्गदर्शन करून निवडणुकीच्या रणनीतीबद्दल भाष्य केलं.

मात्र राज ठाकरेंना याविषयावरून कोंडीत पकडण्यासाठी दुसरा विषय न मिळाल्याने अखेर “मेस्ता एज्यु फेअर २०२०” ह्या शिक्षकांसंबंधित खाजगी आणि अराजकीय संस्थेच्या कार्यक्रमालाच मनसेच्या माथी मारून चुकीचं वृत्त पसरवण्यात आलं आहे आणि त्याला आधार घेण्यात आला तिथे हजेरी लावणाऱ्या लोकांची अल्प उपस्थिती. वास्तविक ‘मेस्ता एज्यु’ अशी कोणतीही मनसेची शिक्षक संघटना नसून नेमकी तीच मनसेची संघटना असल्याचं भासवून त्याला मनसेचा मेळावा असल्याचं चुकीच्या वृत्तांमध्ये भासविण्यात आलं आहे आणि राज ठाकरेंच्या दौऱ्याचा फज्जा उडाल्याचं सांगण्यात आलं आहे.

दुसरं म्हणजे या कार्यक्रमावेळी मंचावर लावण्यात आलेल्या बॅनर’वर काँग्रेसचे मंत्री, अपक्ष मंत्री आणि भाजपचे नेते देखील झळकत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. त्यामुळे ‘मेस्ता’ शीर्षकाखाली मनसे शिक्षक संघटनेचा कोणताही मेळावा नव्हता तर तो पूर्णपणे खाजगी संस्थेचा “आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार” सोहळा होता, ज्याला राज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहावं हादेखील आयोजकांचा विषय असताना देखील तिथल्या अल्प उपस्थितांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना थेट लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरविण्यसामागे नेमका हेतू तरी काय होता ते समोर आलेलं नाही आणि याचा पक्षातील लोकांपेक्षा स्थानिक सत्ताधिकाऱ्यांचाच अधिक हात असण्याची शक्यता आहे जे संभाजीनगर नामकरणावरून अचानक हरकत’मध्ये आल्याचं पाहायला मिळालं होतं.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x