29 March 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

भाजपचे किसन कथोरेंविरुद्ध उल्हासनगरच्या कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश का दिले होते?

BJP MLA Kisan Kathore, Ulhasnagar Court

मुंबई: विधानसभाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांचं नाव निश्चित करण्यासाठी लवकरच ते अर्ज दाखल करतील अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. त्यानंतर आज विधिमंडळ सचिवांकडे नाना पटोले यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे , बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित होते.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदावरुन कोणताही वाद नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाच मिळेल अशी माहिती त्यांनी दिली आहे. दुसरीकडे भाजपाकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. किसन कथोरे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८५ हजार ५४३ मतांनी विजयी झाले होते. तर २०१९ लाही ते मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोटीराम यांचा २६ हजार २३० मतांनी पराभव केला होता.

ऑगस्ट २०१८ मध्ये बनावट कागदपत्र तयार करुन शेतकी सोसायटी तयार केल्याप्रकरणी भाजपचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे अडचणीत आले होते. उल्हासनगर न्यायालयाने याप्रकरणी आमदार कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सागाव येथील शेतकी सोसायटी स्थापन करताना कथोरे यांनी विविध सदस्यांची नावे टाकून, त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप शिवसेनेचे प्रभू पाटील यांनी केला होता. शिवाय या संस्थेला मिळालेल्या शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोपदेखील केले होते. धक्कादायक म्हणजे यात सनदी अधिकारी आर ए राजीव हेदेखील या सोसायटीचे सदस्य आहेत. याप्रकरणी पाटील यांनी न्यायालयात धाव घेतली होती. सदर प्रकरणी उल्हासनगर प्रथम वर्ग न्यायालयने आमदार कथोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. स्वतःच्या कुटुंबियांच्या फायद्यासाठी त्यांनी ही सगळी खोटी कामं केल्याचा आरोप तक्रारदार प्रभू पाटील यांनी केला होता. दरम्यान हे सगळे आरोप कथोरे यांनी फेटाळून लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही स्पष्ट केले की विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील. ते म्हणाले, ‘काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी ३-४ नावं सुचवली होती. आम्ही सांगितली की तुम्ही यापैकी कोणतंही नाव निवडा, आमची त्याला हरकत असेल असं म्हटलं होतं.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x