23 September 2021 1:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

OBC Reservation | मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक | मोठ्या निर्णयाची शक्यता

OBC Reservation

मुंबई, १३ सप्टेंबर | ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात चांगलाच वाद उफाळून आला होता. राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवण्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक भुमिकेत आहे. विद्यमान सरकारवर भाजप नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी 3 वाजता होणार आहे. या बैठकीमध्ये सर्वच पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

OBC Reservation, मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता – CM Uddhav Thackeray called all party meeting over OBC reservation issue :

राज्यातील पक्षीय वाद बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. सदरील बैठकीत मोठा निर्णय घेण्याची शक्यता माध्यमांमध्ये वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या सर्वपक्षीय बैठकीत जोपर्यंत ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकानेही सर्वपक्षीय निर्णयाला मान्यता दिली होती.

भाजप नेत्यांकडून टीका सुरुच:
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरुन सरकारवर निशाणा साधला. पडळकरांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहित एक व्हिडिओ शेअर केला आहे. “आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका…लवकरात लवकर इंपेरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा नाहीतर, ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.”

बावनकुळेंचा आरोप:
संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला ५ वर्षांनी निवडणुका घ्याव्या लागतात. निवडणूक आयोग वेळेवरच निवडणुका घेणार आहे, पण राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचे जाहीर करून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजप प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला असून निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली.

त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न आहे. पण आताही तीन महिन्यांत इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींना आरक्षण द्यावे. नाही तर ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन करणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे या सरकारने पहिल्यापासून ठरवले आहे. तीन महिन्यांत सरकारने डेटा गोळा करून निवडणुका घेतल्या नाही तर ओबीसी समाज सरकारला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: CM Uddhav Thackeray called all party meeting over OBC reservation issue.

हॅशटॅग्स

#OBC(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x