19 October 2021 8:15 AM
अँप डाउनलोड

प्रियंका गांधींच्या रोडशोला लखनऊमध्ये तुफान गर्दी

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी आज ११ फेब्रुवारीपासून ४ दिवसांचा दौरा करणार आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गांधी विमानतळावर दाखल झाल्या असून कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे देखील लखनऊमध्ये दाखल झाले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

लखनऊ विमानतळाबाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली आहे. प्रियंका गांधी यांच्या रोड शोला सुरुवात झाली असून रोड शोमध्ये राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे सहभागी झाले आहेत. लखनऊ विमानतळ ते काँग्रेस कार्यालय असा पंधरा किलोमीटरच्या मार्गावर हा भव्य रोड-शो होत आहे. प्रियंका गांधी यांच्याकडे पूर्व तर सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लखनऊ येथील काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ दिवसांच्या काँग्रेस पक्षाच्या विविध कार्यक्रमांना त्या उपस्थिती दर्शविणार आहेत.

हॅशटॅग्स

#Congress(524)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x