नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात एंट्री केल्यानंतर युपीच्या दौऱ्यासोबत ट्विटरवर देखील आगमन झाले आहे. प्रियंका गांधी वाड्रा या नावाने प्रियंका गांधी यांचे ट्विटरवर @priyankagandhi हे अधिकृत अकाऊंट सुरू झाले आहे. त्याबाबतची माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे.
प्रियंका गांधी यांनी अद्याप कुठलेली ट्विट केलेले नाही. परंतु, त्यांनी काँग्रेस, राहुल गांधी, अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, अशोक गहलोत, सचिन पायलट ज्योतिरादित्य शिंदे आणि अहमद पटेल यासारख्या नेत्यांना फॉलो करत आहेत. त्यांचे अकाऊंट व्हेरिफाईडही करण्यात आले असून अनेकांनी त्यांना त्यांना फॉलो केले आहे.
