20 April 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

आगामी महानगरपालिका निवडणुका | प्रभाग रचनेचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा?

Mumbai Municipal Corporation Election 2022

मुंबई, २४ सप्टेंबर | राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुसाठी प्रभागरचनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुंबई वगळता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवर आधारित घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय समिकरणे बदलणार आहेत. हा निर्णय महाविकास आघाडीला फायदाचा ठरावा म्हणून घेतला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुका | प्रभाग रचनेचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा? – Upcoming Municipal Corporation Elections 2022 in Maharashtra predictions :

महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी निर्णय?
भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना चार सदस्यीय प्रभाग रचना करून त्यांनी अनेक महापालिकेवर आपला झेंडा फटकावला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर त्या निर्णयाला विरोध करत तो रद्द केला. आता बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा हा निर्णय झाला असून, मुंबई वगळून राज्यातील सर्वच आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सर्वच आगामी निवडणुका असणाऱ्या महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता यावी यासाठी हा निर्णय घेतला असेल तर सगळीकडे महाविकास आघाडी एकत्र लढणार का? हे सुद्धा पाहावे लागणार आहे.

काँग्रेसने यापूर्वीच वेगळी निवडणूक लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. या प्रकारामुळे आघाडीत बिघाडीची शक्यता भाजपकडून वर्तवली जात आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने घेतलेला प्रभाग रचनेच्या बदलाचा निर्णय एकत्रितपणे लढण्याचे संकेत आहेत. नगरविकास मंत्री शिंदे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. निर्णयामागे राजकीय उद्देश नाही, परंतु महाविकास आघाडी सरकारला सामावून घेण्याची संधी आहे, असे मत शिंदे यांनी मांडले.

पक्षीय राजकारणाला बळ:
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आता पक्षीय राजकारणाला बळ मिळणार आहे. ज्या पक्षाची संबंधित प्रभागात ताकद असेल शिवाय संबंधित उमेदवारसुद्धा चांगले काम करत असेल तर त्यालाच नागरिक संधी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारसुद्धा काही प्रमाणात अडचणीत आल्याचे दिसून येत असून, जे केवळ 500 ते 600 मतांच्या जीवावर उड्या मारतात त्यांनाही चांगलाच फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिवाय आता प्रत्येक पक्षाची स्वतःची विचारसरणी आहे. त्यामुळे पक्षीय राजकारणालाही आता बळ मिळणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीवर परिणाम काय?
मुंबई महापालिकेत एक प्रभाग एक सदस्य ही पद्धत याआधीही लागू होती. आणि यापुढेही लागू राहणार आहे. यामुळे याचा फायदा सत्ताधारी शिवसेनेला होईल अशी शक्यता राजकीय तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यात महापालिका, नगरपालिका, नगर परिषद यांच्या निवडणूका झाल्या. त्याठिकाणी एक प्रभागात तीन ते चार सदस्य असल्याने त्याचा फायदा विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला झाला. भाजपाच्या अधिक जागा निवडून आल्या. राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या भाजपाला फायदा होईल अशी भीती होती. राज्य सरकारने मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यातून जाऊ नये, यासाठी मुंबईत एक प्रभाग एक सदस्य पद्धतीच ठेवली आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एक प्रभाग एक नगरसेवक ही पद्धत मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. ही पद्धत कायम ठेवण्याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेतील वरिष्ठ पत्रकार सुनील शिंदे यांनी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Upcoming Municipal Corporation Elections 2022 in Maharashtra predictions.

हॅशटॅग्स

#BMCElection2022(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x