15 August 2022 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Xiaomi CyberOne Robot | शाओमीने तयार केला स्मार्ट रोबोट, काम करताना मनुष्याच्या भावनेनुसार विचार करू शकणार Multibagger Mutual Funds | या 3 जबरदस्त मल्टिबॅगर म्युच्युअल फंड योजना लक्षात ठेवा, SIP ने 3 वर्षात लाखोंचा फायदा Horoscope Today | 15 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 2023 Kia Ray | 2023 किआ रे कार लाँच, जबरदस्त लूकसह मिळणार शानदार असे फीचर्स Viral Video | तो बाईक सहित खड्ड्यात पडला की खड्ड्यातून वर आला?, विचित्र अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय अमित शहांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवलं | तर फडणवीसांनी मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादांचं राजकीय वजन घटवलं शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचं खातेवाटप | दादा भुसेंकडून कृषी खातं सत्तारांकडे, शिंदेंकडून मूळ शिवसैनिकांना हलकी खाती
x

डोंबिवली बलात्कार | अनेक आरोपी सत्ताधारी व विरोधक राजकीय पुढाऱ्यांची मुले | भाजप नगरसेविकेचा तर पोलिसांवर फोन करून दबाव

Dombivli gang rape

डोंबिवली, २४ सप्टेंबर | १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफीत बनवून या मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर २९ जणांनी मागील ९ महिन्यांपासून विविध ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून २ अल्पवयीन आरोपींसह २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, उर्वरित ६ आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

डोंबिवली बलात्कार, अनेक आरोपी सत्ताधारी व विरोधक राजकीय पुढाऱ्यांची मुले | भाजप नगरसेविकेचा पोलिसांवर फोनकरून दबाव – Dombivli gang rape relatives of politicians accused from Shiv sena MNS NCP BJP activist :

अल्पवयीन मुलीवर तब्बल ३३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची अमानूष घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बहुतांश आरोपींचे पालक हे राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने पोलिसांवरची जबाबदारी वाढली आहे.

कल्याणमधील पुढाऱ्यांची मुले असल्याचा संशय:
कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांतील पुढाऱ्यांची मुले यात आरोपी असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींची नावे उघड केली नाहीत. दरम्यान, पीडितेला उपचारासाठी कळवा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची तब्येत स्थिर आहे.

आरोपींनी अटक झाल्याची माहिती मिळताच शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि राजकीय पुढाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यास भेट देऊन या दबावतंत्राची चुणूक दाखवली. भाजपच्या नगरसेविकेने तर पोलीस ठाण्यात फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हेगारांचे स्थानिक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असल्याने राजकीय हस्तक्षेप होण्याची भीती आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तर काही मीडियाची गर्दी पाहून आल्या पावली माघारी फिरले. एका राजकीय पदाधिकाऱ्याने चेहऱ्यावर मास्क लावून आपला चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती.

आरोपी मुलांच्या पालकांचं म्हणणं काय?
* आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली होती. आमची मुले निष्पाप असून त्यांना या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचा आरोप आरोपींच्या पालकांनी केला.

* पीडित मुलीने ओळखत नसल्याचे सांगूनही मुलांना पोलिसांनी आरोपी केल्याचा दावा काही पालकांनी केला. मुले लहान असून त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांची आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असेही ते म्हणाले.

* माझा मुलगा आजारी असतानाही त्याला घरातून झोपेतून उठवून पोलिसांनी नेले, असे एका पालकाने सांगितले. जानेवारीपासून अत्याचार सुरू होते मग तेव्हाच पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार का केली नाही, असा सवाल त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Dombivli gang rape relatives of politicians accused from Shiv sena MNS NCP BJP activist.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x