13 December 2024 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
x

आज शरद पवार ईडी कार्यालयात; परिसरात मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कलम १४४ लागू

ED Notice, ED Summon, ED Enquiry, Sharad Pawar, NCP, Raj Thackeray, Kohinoor Mill

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे आता ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचतील. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. ‘विधानसभा निवडणुकांमुळे महिनाभर प्रचारासाठी मुंबईबाहेर असेन. यादरम्यान ‘ईडी’कडून ‘प्रेमसंदेश’ आल्यास त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहता येणार नसल्याने मी स्वत:च शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयात जाणार आहे’, असे पवार यांनी म्हटले होते. मात्र, कोणत्याही प्रकरणात एखाद्या व्यक्तीची किंवा आरोपीची चौकशी करण्याचा निर्णय घेणे हा तपासाधिकाऱ्याचा अधिकार असतो. या प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. जोपर्यंत अधिकृतपणे चौकशीसाठी बोलाविले जात नाही, तोपर्यंत अभ्यागतांच्या चौकशीचे कोणतेही अधिकार ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना नसतात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ची पंचाईत झाली आहे.

राज्य शिखर बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ईडीने बँकेच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबतच शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यामुळे पवारांची देखील ईडी चौकशी होणार हे निश्चिच झालं. मात्र, ‘पुढचा महिनाभर मी राज्यात प्रचार करणार असल्यामुळे २७ सप्टेंबरलाच ईडीच्या कार्यालयात स्वत: हजर राहून त्यांचा ‘पाहुणचार’ मी घेणार आहे’, असं शरद पवारांनी जाहीर केलं. पण आता हा ‘पाहुणचार’ ईडीच्या कठोर चौकशीचा नसून फक्त शिष्टाचाराचा भाग म्हणून केला जाणारा पाहुणचार ठरणार आहे. शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच केली जाणार असून आत्ता फक्त शिष्टाई म्हणून त्यांचा ईडीमध्ये सामान्य पाहुणचार केला जाईल, असं ईडीनं ठरवल्याचं प्रसार माध्यमांच्या हाती वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x