12 December 2024 5:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

महाडमध्ये ५ मजली ईमारत कोसळली | शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Five floor building collapse, Mahad

रायगड, २४ ऑगस्ट : महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या ईमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. ईमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली आहे. अशी माहिती काँग्रेस नेते माणिक जगताप यांनी दिली आहे. पोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, “काजळपुरा भागातील ‘तारीक गार्डन’ नावाची इमारत कोसळली असून या इमारतीत ४५ ते ४७ फ्लॅट होते. त्यातील ७० ते ८० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, १५ जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

 

News English Summary: In Mahad city of Raigad district, a five-storey residential building has been demolished like an address bungalow. The tragic accident took place around 7 pm on Monday. It is feared that 70 to 80 people are trapped under the pile of this building.

News English Title: Five floor building collapse in Mahad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Thane(12)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x