27 May 2022 4:38 AM
अँप डाउनलोड

कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

Passengers Plane Collapses in Kazakhstan

कझाकिस्तानमध्ये १०० प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. अल्माटी विमानतळावर टेक ऑफ घेताना जवळ असलेल्या दोन मजली इमारतीवर हे विमान आदळलं. यावेळी विमानात १०० प्रवासी प्रवास करत होते. यापैकी काही प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. कझाकिस्तानच्या मंत्रालयाने सांगितेल की विमानाने उंची गमावली आणि सकाळी ७.२२ वाजता सिमेंटच्या संरक्षण भिंत आणि दुमजली इमारतीवर कोसळले. हे विमान अल्मटीहून नूरसुल्तानला जात होते. हे विमान तलगार भागात कोसळले असून हा भाग विमानतळाला लागूनच आहे. अपघातानंतर काही वेळातच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले.

 

Web Title:  Plane Carrying total 100 Passengers Collapses in Kazakhstan Seven killed.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x