19 May 2021 2:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | भाजपच्या योगी सरकारचा कळस | गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी पेट्रोल-टायर टाकून जाळले लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त ५ राज्यातील निवडणुकीचे दुष्परिणाम देश भोगतोय | आता चंद्रकांतदादा म्हणाले उद्या निवडणुका घ्या, 400 जागा निश्चित भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण बापरे! | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार?, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन - छत्रपती संभाजीराजे खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध
x

कोरोनाची लागण झाली की गोळ्याचं घालतोय; म्हणे उत्तर कोरिया कोरोनमुक्त

Corona Crisis, Covid 19, North Korea

प्योंगयांग, २ एप्रिल: चीनमधील हुबेई प्रातांतून सुरू झालेल्या करोना व्हायरस संसर्ग हळूहळू जगभरात पसरला आहे. जगातील जवळपास ६० देशांमध्ये करोना व्हायरस पसरला आहे. करोनामुळे हजारो लोकं मृत्यूमुखी पडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने देखोल करोना हा जगासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये जवळपास २९१२ जणांचा मृत्यू झाला होता. हुबेई प्रांतात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. दक्षिण कोरियात देखील अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युरोपमध्येही करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर पसरला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, सुरुवातीला उत्तर कोरियात देखील कोरोना पसरल्याचं वृत्त होतं. इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, किम जोंग यांनी पहिल्या कोरोना रुग्णाला थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. कोरोना व्हायरस हा उत्तर कोरियामध्ये पसरू नये यासाठी किम जोंग यांनी रुग्णांना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी उत्तर कोरियातील एक व्यक्ती कामानिमित्त चीनमध्ये गेली होती. त्यावेळी तिथे त्याला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती मायदेशी परतली तेव्हा त्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचं समजताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले होता.

दरम्यान, उत्तर कोरियाचे केंद्रीय आपत्कालीन महामारी विरोधी विभागाचे संचालक पाक म्योंग सु यांनी दावा केला की, देशाचे प्रयत्न संपूर्णपणे यशस्वी ठरले. आमच्या देशात आतापर्यंत एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आलेली नाही. आमच्या देशात प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींची चाचणी करुन तसेच सर्व वस्तू संक्रमण मुक्त करण्याबरोबरच सीमा बंद करणे तसेच समुद्र आणि हवाई मार्ग बंद करण्यासारखे पाऊल योग्यवेळी उचलण्यात आले. त्यामुळेच आम्हाला यश आले.

 

News English Summary: Pak Myong Su, director of the anti-epidemic division headquarters of North Korea’s central emergency epidemic, claimed that the country’s efforts were a total success. So far no one has been found coroner in our country. All the people who entered our country were taken in due course of time to check all the goods and free the transit, as well as close the border and close the sea and air routes. That’s why we were successful.

 

News English Title: Story North Korea claims no Corona virus Covid 19 case in country News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1369)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x