20 April 2024 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

धक्का ! ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गूगलला बातम्यांसाठी पैसे द्यावे लागणार

Australia, Facebook, Google, News Code of Conduct

कॅनबेरा, १ जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी काही दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.

त्यानंतर मुकेश अंबानींची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगल तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तत्पूर्वीफेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी म्हणून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एका बाजूला भारतात गुगल आणि फेसबुक सारख्या बलाढ्य कंपन्यांना भारतात रेड कार्पेट मिळत असताना ऑस्ट्रेलियात याच कंपन्यांवर बंधन लागू होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाने फेसबुक आणि गूगलला मोठा धक्का दिला आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये फेसबुक आणि गूगलला बातम्यांसाठी पैसे द्यावे लागतील. कोरोना विषाणूनंतर तेथील मीडिया उद्योग तोट्यात जात असताना ऑस्ट्रेलिया सरकारने हे पाऊल उचलले. ऑस्ट्रेलियन सरकारने शुक्रवारी या प्रकरणाचा खुलासा केला. या देयकासंदर्भात शासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, जी लवकरच संसदेत पास होण्यासाठी सादर केली जातील.

ऑस्ट्रेलिया सरकारमधील कोषाध्यक्ष जोश फ्रायडेनबर्ग म्हणाले की, ‘आम्ही गूगल आणि फेसबुकशी १८ महिन्यांपासून बातम्यांच्या पैशाबद्दल बोललो पण दोघेही या प्रकरणात एकत्र येऊ शकले नाहीत’. तसेच या आठवड्यात संसदेत गूगल आणि फेसबुकवरील बातम्यांकरिता पैशे देण्याबाबतचा कायदा सादर करण्यात येईल. यानंतर या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला कोट्यवधी रुपये मोजावे लागतील. तथापि, हा दंड फक्त ऑस्ट्रेलियाशी संबंधित बातमी सामग्रीसाठी असेल. आमचे लक्ष जगातील सर्वात प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्म गूगल आणि फेसबुकवर आहे. सरकारने याबाबतचे संकेत एप्रिल महिन्यातच दिले होते.

 

News English Summary: Australia has dealt a major blow to Facebook and Google. Now in Australia, Facebook and Google will have to pay for the news. The Australian government took this step at a time when the local media industry was losing money after the corona virus.

News English Title: Australia to make Facebook Google pay for news in world first News Latest Updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x