15 December 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

कोरोना आपत्ती: अमेरिकेत थैमान, केवळ २४ तासांत १९२० बळी

Covid19, US Corona Crisis, US President Donald Trump

वॉशिंग्टन, १२ एप्रिल: जगभरात करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असून मृतांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. तर मृतांची संख्या २० हजारांहून अधिक झाली आहे. करोनाच्या संसर्गाने आता सर्वाधिक मृत्यूंची नोंद अमेरिकेत झाली आहे. युरोप, अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. इटली व स्पेनमध्ये मागील काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत स्थिरता आल्याचे चित्र आहे. इटलीत १९ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, स्पेनमध्ये १६ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या याचा सर्वाधिक फटका जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसताना दिसत आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार गत २४ तासांत एकट्या अमेरिकेत करोनामुळे तब्बल १ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एएफपी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था गर्तेत आहे. मनुष्यहानी आणि वित्तहानी या दोनमधून त्यांना निवड करायची आहे. जे सर्वाधिक कमी नुकसान करणारं असेल तो पर्याय डोनाल्ड ट्रम्प निवडतील असं बोललं जात आहे. त्यामुळे आता अर्थव्यवस्थाबाबत डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. न्यूयॉर्क हे अमेरिकेत कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. या शहरातील १.६ दशलक्ष लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. येथे कोरोनामुळे ५२८० लोक मरण पावले आहेत. तर संपूर्ण अमेरिकेत ५ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

News English Summary: Coronary infection is spreading worldwide and the number of deaths is increasing. The number of people in the United States has risen to over five million. The death toll has risen to over 20,000. Coronary infection now has the highest death toll in the United States. In Europe, the United States continues to thrive. Italy and Spain have seen a steady increase in the number of coronary arteries in the past few days. There have been over 19,000 deaths in Italy. So, more than 16,000 people have died in Spain.

News English Summary: Story United States of America records 1920 deaths related to the corona crisis over the past 24 hours Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x