14 December 2024 9:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

कोरोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाया निघून जाईल - डोनाल्ड ट्रम्प

US President Donald Trump, Covid 19 Vaccine, America

वॉशिंग्टन, ९ मे : कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान ठरलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विषाणूच्या संसर्गामुळे जगातील कित्येक देश आणि या देशांतील कैक नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेकांना तर, यामध्ये आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशामध्येच सध्याच्या घडीला कोरोनाचा सर्वाधिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणारा देश म्हणून अमेरिकेचं नाव पुढे येत आहे.

देश अतिशय मोठ्या संकटातून जात असतानाच दर दिवशी संपूर्ण जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्या अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. कधी स्वत:ची कोरोना चाचणी करणारे, तर कधी माध्यमांसमोर येऊन कोरोनाच्या परिस्थितीविषयी माहिती देणारे ट्रम्प आता असं काही भाकित करुन गेले आहेत ज्यामुळे ते पुन्हा एकदा वैश्विक स्तरावर अनेकांचं लक्ष वेधत आहेत.

नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

“कोरोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाया निघून जाईल. असा दूर जाईल की आपण त्याला पुन्हा पाहूच शकणार नाही. आत्तापर्यंत अनेक आजार आले आणि कोणत्याही लसीशिवाय निघून गेले तसाच करोनाही जाईल. हे सगळं लगेच घडेल का? तर तसं माझं म्हणणं नाही. मात्र एक वेळ अशी येईल की कोरोना नाहीसा झालेला असेल.” असंही त्यांनी म्हटलं आहे.

अमेरिका हा असा देश आहे जिथे कोरोनामुळे आत्तापर्यंत ७५ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. तर १३ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

News English Summary: The corona virus will go away without any vaccines. It will go away so that you will never see him again. Corona will go away as many diseases have come and gone without any vaccine so far. Will it all happen right away? So that’s not what I’m saying. But one day Corona will be gone. ” Even so, Donald Trump said.

News English Title: Story US President Donald Trump Says Corona virus Will Disappear Without A Covid 19 Vaccine News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x