29 March 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

कुलभूषण जाधव यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, पाकिस्तानचा दावा

Pakistan, Kulbhushan Jadhav, Refused To File Review Petition

नवी दिल्ली, ८ जुलै : पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधन यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना दुसरा कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

२००६ पासून कुलभूषण जाधव हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. मात्र कुलभूषण जाधव यांनी हेरगिरी केल्याचा दावा भारताने फेटाळला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. 2017 मध्ये भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) हे प्रकरण सोपावलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टानं पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश (Consular Access)देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितलं.

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताकडून अथक प्रयत्न सुरू आहेत. तसेच, बॅक चॅनेलवरूनही पाकिस्तान सरकारला समजावण्यात आल्याचं ज्येष्ठ वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं. या प्रकरणात साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) भारतीय समुपदेशक होते. ते भारताचे माजी सॉलिसिटर जनरल देखील आहेत.

 

News English Summary: Former Indian Navy officer Kulbhushan Jadhan, who is being held in Pakistan on charges of so-called espionage, has refused to file a reconsideration petition, Pakistan has said.

News English Title: Pakistan Says Kulbhushan Jadhav Refused To File Review Petition Offers Second Consular Access News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Kulbhushan Jadhav(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x