21 November 2019 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग; ६२ प्रवाशांचा मृत्यू

karachi rawalpindi tezgam express train, Huge Fire, Pakistan

कराची: पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला लागलेल्या भीषण आगीत ६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. स्फोट झाल्यानं एक्स्प्रेसला आग लागल्याचं सांगितलं जातंय. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी म्हणजेच आज कराची रावळपिंडी तेजग्रा एक्स्प्रेसला भीषण आग लागली. या आगीचा भडका उडाला, या आगीत ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. लियाकतपूर या ठिकाणी आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली आणि भडका उडाला अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, काही प्रवाशांनी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.

हॅशटॅग्स

#Pakistan(21)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या