13 May 2021 9:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

भारतासमोर ३१४ धावांचे आव्हान

Indian Cricket Team

रांची : विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत आज तिसर्‍या सामन्यात विजय मिळवून मालिका विजय मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जात आहे. ५ सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले २ सामने जिंकून मालिकेत आघा़डी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ खेळेल. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३०० पार गेली असून भारतासमोर विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

५ सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन सामने जिंकून टीम इंडियाने २-० अशी आघाडी घेतली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आपल्या घरच्या मैदानावरील बहुधा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवून धोनीला विजयाची भेट देण्यास उत्सुक आहे.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x