11 April 2021 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये कोरोना व्हायरसची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही अधिक घातक - योगी आदित्यनाथ देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का? पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
x

माजी क्रिकेटर मनोज तिवारी आणि अभिनेत्री सयानी घोषचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

Former cricketer Manoj Tiwari, Sayani Ghosh, Trinamool Congress, CM Mamata Banerjee

कोलकत्ता, २५ फेब्रुवारी: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय मैदानात चेहऱ्यावर बोली लावली जात आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू मनोज तिवारी यांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश झाला. ममता बॅनर्जी यांनी हुगलीच्या डनलप ग्राऊंड येथे जाहीरसभा घेतली. या सभेत मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत केले. क्रिकेटच्या विश्वातून राजकारणात आलेले मनोज तिवारी यांनी भाजपवर टीका केली. मनोज तिवारी यांनी सांगितले, की मी एक क्रिकेटर आहे. ज्याने भारताचा झेंडा घेतला. मला जे प्रेम मिळाले ते हिंदू किंवा मुस्लिम यांच्याकडून नाही तर भारतीयांकडून मिळाले आहे. भाजप जातीयवादाच्या नावावर विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ममता बॅनर्जी सेक्युलर मार्गाने पुढे जात आहे.

दरम्यान, हुगलीच्या मंचवर आज मनोज तिवारी यांच्याशिवाय काही अभिनेत्री, अभिनेता आणि प्रोड्युसरही पक्षाचा झेंडा हाती घेताना दिसले. अभिनेत्री सयानी घोष, जून मालिया, प्रोड्युसर राज चक्रवर्ती आणि अभिनेता कंचन मलिक यांनीही ममता बॅनर्जी यांच्या उपस्थित तृणमूल काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ही चार राज्ये व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच म्हटले होते. या राज्यात निर्भय व निष्पक्ष वातावरणात विधानसभा निवडणुका पार पाडणे; हे आयोगासमोरचे मोठे आव्हान आहे.

 

News English Summary: Apart from Manoj Tiwari, some actresses, actors and producers were also seen holding party flags on Hooghly’s stage today. Actress Sayani Ghosh, June Malia, producer Raj Chakraborty and actor Kanchan Malik also carried the Trinamool Congress flag in the presence of Mamata Banerjee.

News English Title: Former cricketer Manoj Tiwari and Sayani Ghosh join Trinamool Congress in presence of CM Mamata Banerjee news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x