15 December 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

कर्मचारी कपातीची कुऱ्हाड आता आयटी क्षेत्रावर; कॉग्निझंट करणार सुरुवात

IT Company cognizant, Infosys, TCS

बेंगळुरू: मंदीची झळ आता आयटी क्षेत्रावर देखील पडली आहे. कॉस्ट कटिंगची कारणं पुढे रेटून आता आयटी कंपन्यांनी देखील कर्मचारी कपातीचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे भारतात मोठा रोजगार हा आयटी क्षेत्रातील असून यामध्ये उच्च शिक्षित तरुणांचा मोठा वाटा असून केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरात स्थायिक झालेले भारतीय लोकं आयटी क्षेत्रात नोकरीला आहे.

मंदीची झळ विशेषकरून बांधकाम, टेक्सटाईल्स, ऑटो आणि इतर क्षेत्रांना अधिक जाणवत होती. मात्र त्यात आता आयटी क्षेत्राने डोकं वर काढल्याने उच्च शिक्षित तरुणांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. काही दिवसांपूर्वी इन्फोसिस’सारख्या बलाढ्य कंपनीत देखील गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर शेअरचे भाव गडगडून कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आयटी क्षेत्रात देखील आर्थिक चणचण जाणवणार याची चुणूक लागली होती.

दरम्यान, अमेरिकन आयटी कंपनी कॉग्निझंट आगामी काही महिन्यांत कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ७,००० मध्यम आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. याशिवाय कंपनी कंटेट मॉडरेशन बिझनेसमधून बाहेर पडण्याचा विचारही करत आहे. कंपनीनं बुधवारी तशी अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. आगामी काही महिन्यांत जगभरातून १२,००० मध्यम आणि वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतल्याचंही कंपनीनं सांगितलं.

कॉग्निझंटचे नवे सीईओ ब्रायन हम्फ्रिज यांनी मागील काही दिवसांत कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी पुनर्गठणची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी कॉस्ट कटिंगचा मार्ग स्वीकारला होता. या कंपनीत जवळपास २.९ लाख कर्मचारी काम करतात. त्यात तब्बल २ लाख कर्मचारी हे भारतीय आहेत. ३० सप्टेंबर २०१९ रोजी कंपनीत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २, ८९, ९९० होती. तर ३० जून २०१९ रोजी कंपनीत एकूण २, ८८, २०० कर्मचारी होते.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x