13 November 2019 11:54 PM
अँप डाउनलोड

मोदी सरकारची धोरणं; बँकांसकट १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना उद्यापासून २ दिवस संपावर

नवी दिल्ली : देशभरातील कामगारांच्या प्रश्नावर डाव्या कामगार संघटनांनी उद्यापासून म्हणजे ८ आणि ९ जानेवारी रोजी संप कडकडीत पुकारला आहे. इंटक, आयटक, सीटू, हिंद मजदूर सेवा, आयपीएफ अशा देशभरातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. यामध्ये देशभरातील कोट्यवधी कामगार सामील होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

यात राष्ट्रीय बँक कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यामुळे उद्या आणि परवा या २ दिवशी देशभरातील बँका बंद राहणार आहेत असे घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकाचे विलीनीकरण आणि इतर विविध प्रश्नांमुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अलीकडेच जाहीर संप पुकारला होता त्यामुळे बँका तब्बल आणि सलग ५ दिवस बंद होत्या. त्यात पुन्हा देशभरातील १० लाखाहून अधिक बँक कर्मचारी उद्या आणि परवाच्या संपात सहभागी होणार आहेत.

नवी दिल्ली येथे देशातील एकूण १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि इतर उद्योगातील देशपातळीवरील संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आहे. तेव्हा हा निर्णय अधिकृत पणे जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वे, बँक, विमा, परिवहन, पोर्ट ट्रस्ट, कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, स्टील, फेरीवाले, अंगणवाडी महिला, माथाडी, आशा वर्कर, शिक्षक, नर्स, नगरपालिका कामगार, कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार, घरकामगार, आऊटसोर्स कामगार असे विविध उद्योगातील आणि स्तरातील कामगार या संपात सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1036)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या