19 October 2021 8:57 AM
अँप डाउनलोड

प्रियंका गांधी लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ५ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्यात मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडसारख्या हिंदी भाषिक आणि मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसला मिळवलेल यश आता द्विगुणित करण्याची रणनीती आखली जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, याच वर्षी आणि २ ते ३ महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रसार माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ रायबरेलीतून प्रियंका गांधी वढेरा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कारणास्तव काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता रायबरेलीतील पक्षाची तयारी आणि संघटनेतील फेरबदलासाठी प्रियंका गांधी यांचा सल्ला प्राधान्याने घेतला जात आहे असे वृत्त आहे.

एनबीटी अर्थात नवभारत टाईम ने तसे अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले आहे. प्रियंका गांधी यांच्या मंजुरीनंतरच आठ ब्लॉक अध्यक्ष बदलण्यात आले आहेत. मागील काही वर्षांपासून ठराविक कालावधीनंतर प्रियंका गांधी सातत्याने राजकारणात सक्रीय होण्याची चर्चा रंगत असते, . त्यामुळे काँग्रेस अडचणीच्या काळात प्रियंका यांना केवळ निवडणुकीत उभा करणे असेच त्यांची शैली आणि देहबोली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे असल्याने काँग्रेसला सुद्धा त्या सक्रिय राजकारणात नेहमीच हव्या होत्या. त्या उत्तर प्रदेशातील राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Congress(524)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x