11 July 2020 2:17 PM
अँप डाउनलोड

MTNL डबघाईला? कर्मचार्‍यांचे पगारासाठी सोमवारी निदर्शने आंदोलन

मुंबई : एमटीएनएलच्या कर्मचार्‍यांचा जानेवारी महिन्याचा पगार अद्यापही न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. एकेकाळी भारत सरकारला हजारो कोटींचा वार्षिक फायदा मिळवून देणारी एमटीएनएल सध्या भारत सरकारच्या दिशाहीन व अदूरदर्शी धोरणांमुळे आर्थिक गर्तेत अडकण्याला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्त्वाखालील कामगार संघटना देखील कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

प्रशासनाच्या पगार वेळेवर न देण्याच्या कारस्थानात कामगार संघाच्या नेतृत्त्वाचा देखील सहभाग असावा अशी शंका आहे. कारण या कामगार संघाने प्रशासनाच्या या कृतीवर कोणतीही कृती केलेली नाही. कामगार संघाने यावर डोळेझाक केल्याचा आरोप करण्यात येत आहे आणि खासदार अरविंद सावंत यांना लोकसभेची उमेदवारी पुन्हा मिळाली असून कर्मचार्‍यांनी मनापासून अरविंद सावंतांना निवडून आणावे असे आवाहन करीत आहेत. मात्र पगाराबाबत ते काहीही भाष्य नाहीत.

MTNL मधील १० युनियन्स आणि असोसिएकूण एशन्स एकत्र असणार्‍या मुंबईतील युनायटेड फोरमच्या छत्राखाली, परंतु कर्मचारी २०१८ च्या डिसेंबरपासून सतत सनदशीर आंदोलन करीत आहेत. मुंबई दिल्लीच्या युनायटेड फोरमचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवार १८ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन होणार असून कार्यरत कर्मचार्‍यांना पाठिंबा देण्यासाठी एमटीएनएलमधील निवृत्त कर्मचारीपण या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(891)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x