26 September 2020 8:21 PM
अँप डाउनलोड

दहशतवाद्यांना आश्रयाची पाकिस्तानला मोठी किंमत चुकवावी लागेल : इराण लष्कर

दहशतवादी कारवायांनी इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याने सध्या पाकिस्तानविरुद्ध इराण देखील संतापल्याचे दिसते. दरम्यान, दहशवादी कारवायांना आश्रय देणाऱ्या आणि दहशदवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला इराणने चांगलेच धारेवर धरले आहे. दहशतवाद्यांना पोसण्यामुळे भविष्यात पाकिस्तानला मोठ्ठी किंमत मोजावी लागेल असा सज्जड दम इराणने दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

इराणच्या सरकारी वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत रिवोल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी यांनी सदर मुलाखतीत हा सज्जड दिला आहे. सैनिकांच्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यातील षडयंत्रात असणाऱ्यांना समर्थन थेट देत असल्याचा पाकिस्तानवर इराण रिवाल्यूशनरी गार्ड्सने आरोप केला आहे. त्यामुळे जगभरातून पाकिस्तानविरुद्ध वातावरण तापताना दिसत आहे.

भारतातील हल्ल्या प्रमाणेच बुधवारी इराणमध्ये रिवोल्यूशनरी गार्ड्सवर झालेल्या दहशतावदी हल्ल्यात तब्बल २७ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला दहशतवादी संघटना जैश-अल-अद्लने केल्याचे जाफरी म्हणाले. जैश-अल-अद्लकडे इशारा करत जाफरी यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाना साधला आहे. जाफरी म्हणाले की, ‘दहशतवादी आणि मुस्लीम धर्माला धोकादायक असलेले कुठे आहेत हे पाकिस्तान सराकारला माहित आहे. पाकिस्तानच्या सैनिकांचे या दहशतवाद्यांना समर्थन आहे.’ दरम्यान जर पाकस्तान सरकारने दहशतवाद्यावर कोणतीही कारवाई केली नाही तर आम्ही या दहशतवादी संघटनांना आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे खडसावले.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x