12 December 2024 8:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोनाचं उगमस्थान; ७६ दिवसांनी वुहानचा 'लॉक' उघडणार

China Corona Crisis, Covid19, Lock Down, Wuhan

वुहान, ८ एप्रिल : चीनमधले वुहान शहर म्हणजे कोरोनाचे केंद्रस्थान झाले होते. तब्बल ३ महिने वुहान शहर कोरोनाशी दोनहात करत होता. वुहान हे कोरोनाचे केंद्र आहे आणि या शहरात या विषाणूमुळे तब्बल ३३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये ८२ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. ताज्या सरकारी आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या काही आठवड्यांत शहरातील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत. मंगळवारी (७ एप्रिल) रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत कोरोनाचे एकही प्रकरण समोर आले नाही. त्यामुळेच सरकारने लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

८ जानेवारी २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) वुहान या चीनमधील शहरात न्यूमोनियाच्या काही केसेस आढळल्या आहेत ज्यामध्ये श्वसनयंत्रणेवर ताण पडतो. डिसेंबरमध्ये ५९ जणांना हा आजार झाल्याचे जाहीर करण्यात आले. वुहान बाजारात प्राण्यांचं मांस विकणाऱ्या अनेक विक्रेत्यांना या आजारानं ग्रासल्याचं समोर आलं.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनने २५ जानेवारी रोजी टोकाचं पाउल उचललं. वुहान या संपूर्ण शहरात लॉकडाउन करण्यात येतं त्यापाठोपाठ संपूर्ण हुबेई प्रांत लॉकडाउन करण्यात येतो आणि तब्बल ५.६ कोटी चिनी जनतेचा उर्वरीत जगापासून संपर्क तोडण्यात येतो. अन्य देशही चीनमधून आपापल्या नागरिकांना परत आणण्याचे व त्यांचे विलगीकरण करण्याचे पाउल उचलतात. जानेवारीच्या अखेरापर्यंत चीनमध्ये ६,००० जणांना या विषाणूची लागण झाल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आलं. करोना प्रकारातल्या नव्या विषाणूने सार्समुळे झालेल्या केसेसना मागे टाकल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली होती, परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार व प्रवासावर मात्र निर्बंध सुचवले नाही आणि अडचणी वाढल्या होत्या.

 

News English Summary: Wuhan city in China became the center of the Corona. For three months, Wuhan had been in the city of Corona for two months. Wuhan is the epicenter of Corona, and more than 3300 people have died from the virus in the city. More than 82,000 people infected Corona in Wuhan. Looking at the latest government figures, the city’s Corona cases have dropped sharply in the past few weeks. Government data released on Tuesday (April 7th) showed no Corona case. That is why the government has decided to remove the lock down.

News English Title: Story corona virus China Wuhan ends lockdown after 76 days hundreds of people leaving Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x