11 July 2020 2:05 PM
अँप डाउनलोड

अमेरिकेतील पत्रकार देशद्रोही, त्यामुळेच माध्यमांची विश्वासार्हता खालावली आहे: डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत अमेरिकेतील पत्रकारांवर चांगलच तोंडसुख घेतलं आहे. अमेरिकेतील देशाप्रती होणाऱ्या नकारात्मक पत्रकारितेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चांगलेच संतापल्याचे त्यांच्या ट्विट वरून स्पष्ट जाणवते आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

अमेरिकेतील माध्यमांवर सडकून टीका करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की,’अमेरिकेतील पत्रकार हे देशद्रोही आहेत, ते त्यांच्या वृत्तांकनामुळे जनतेचा जीव धोक्यात घालत आहेत, ट्रम्प विरोधी भूमिकेच्या अतिरेकामुळे प्रसारमाध्यमे आमच्या सरकारच्या कामकाजाची अंतर्गत माहिती उघड करत आहेत. त्यामुळे केवळ पत्रकारच नव्हे, तर अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. हे देशभक्तीचे लक्षण नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.

पुढे त्यांनी पुन्हा एक ट्विट करत म्हटलं आहे की,’आमची अत्यंत सकारात्मक कामगिरी असताना सुद्धा, माझ्या प्रशासनाचे ९० टक्के वार्तांकन हे नकारात्मक आहे. त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता सद्यस्थितीत सर्वाधिक खालावली आहे, यात आश्चर्य नसून, मरणपंथाला लागलेल्या वृत्तपत्र उद्योगातील ट्रम्प द्वेष्ट्यांना हा महान देश विकता येणार नाही. त्यांनी लक्ष विचलित करण्याचा किंवा वास्तव झाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी माझ्या नेतृत्वाखाली देश उत्तम प्रगती करत आहे,’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आवर्जून म्हटले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात अमेरिकेत याचे काय पडसाद उमटतात ते पाहावं लागणार आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Donald Trump(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x