14 December 2024 5:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

पोलिस आयुक्तालयातील DVR गायब | परमवीरसिंह यांनी ATS ला चकविले | चौकशी व्हावी

Former Mumbai CP Parambir Singh, Sachin Vaze, Sachin Sawant

मुंबई, २७ मार्च: सचिन वाझे आणि मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यातील भेटींवर शंका उपस्थित करत काँग्रेसने काही सवाल केले आहेत. सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते.

त्यामुळे वाझे सिंह यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंह यांच्या कार्यालयातीलच आहे,” असं काँग्रेसने सिंह यांच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला आहे. रश्मी शुक्ला या फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी आहेत, हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांनी पदाचा दुरूपयोग करण्यापर्यंत मजल जाते. त्यांनी आपण माफी मागितल्याची माहिती फडणवीसांना दिली नसेल का? परमबीर सिंह यांच्याकडून दुसरीकडे लक्ष घेऊन जायचं होतं का? याच उत्तर यातून मिळतं. सबळ पुरावा द्यायचा असेल, तर दोन व्यक्तीच्या संभाषणाची रेकॉर्डिंग द्यायला हवी. ती तर दिली नाही. पण ऐकीव माहिती आधारे, निकवर्तींयांकडून असा पुरावा तयार करण्याचा प्रयत्न केला गेला,” असा आरोप सावंत यांनी केला आहे.

एटीएसने १० मार्च रोजी परमबीर सिंग यांच्या कार्यालयाकडे डिव्हीआर मागितला होता. तो एटीएसला देण्यातही आला होता. परंतु, डिव्हीआर देणं ही मोठी चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा एटीएस प्रमुखांना फोन केला गेला आणि डिव्हीआर मागितला गेला. एटीएसने हा डिव्हीआर परत दिला. त्यानंतर तो गायबच आहे, अशी धक्कादायक माहिती देतानाच या डिव्हीआरमध्ये कुणाच्या हालचाली होत्या? तो अचानक कसा गायब करण्यात आला? तो एटीएसकडून कुणी मागून घेतला? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याची एनआयए चौकशी का करत नाही?, असा सवाल करतानाच एनआयए जर चौकशी करत नसेल तर राज्य सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली.

 

News English Summary: The Congress has raised some questions over the meeting between Sachin Vaze and former Mumbai Police Commissioner Parambir Singh. Sachin Vaze had lodged a complaint against Home Minister Anil Deshmukh directly with Parambir Singh. Vaze was an API rank officer. They had many officers on them. Bypassing all these officers, Vaze complained directly to Singh. So it was clear how close he was to Vaze Singh.

News English Title: Former Mumbai CP Parambir Singh had closed relation with Sachin Vaze said Sachin Sawant news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x