27 June 2022 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

अँटिलिया आणि सचिन वाझे प्रकरण | NIA सर्वात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत

NIA, Sachin Vaze, Parambir Singh

मुंबई, १८ मार्च: अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात ‘कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली असून नगराळे यांनी सायंकाळी तत्काळ मुंबई पोलिस अायुक्तपदाचा पदभारही स्वीकारला.

अँटिलिया प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक वाझे यांचा हात असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनअायए) तपासात समोर अाल्यानंतर वाझे यांच्यामागे असलेल्या ‘अदृश्य शक्ती’चा अाता शोध घेतला जात अाहे. या प्रकरणामुळे ठाकरे सरकार अाणि मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून आघाडीचे नेते, मंत्री यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. बुधवारी सकाळी पुन्हा ‘सह्याद्री’ विश्रामगृहावर अाघाडीच्या निवडक मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ‘सरकारचा मोठा निर्णय’ जाहीर केला.

म्हणून परमबीरसिंग यांना हटवले:

  • १६ वर्षे निलंबित असूनही ६ जून २०२० रोजी परमबीरसिंग यांच्या आदेशाने सचिन वाझे यांची सहायक पोलिस निरीक्षकपदी फेरनियुक्ती
  • काही दिवसांतच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना डावलून वाझे यांची क्राइम इंटेलिजन्स युनिट (सीआययू) प्रमुखपदी नियुक्ती.
  • बहुचर्चित टीआरपी घोटाळा, अन्वय नाईक अात्महत्याप्रकरणी “रिपब्लिक’चे संपादक अर्णब गोस्वामींना अटक, कंगना-हृतिक ई-मेल वाद आदी प्रकरणांची जबाबदारी वाझेंकडे दिली.
  • अँटिलिया प्रकरणाचा तपासही वाझेंनाच दिला, परंतु टीका झाल्यावर त्यांना हटवले.

परमबीरसिंगांकडे संशयाची सुई;
सचिन वाझे यांनी अँटिलिया स्फोटकांचे नाट्यही परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरूनच केले, असा संशय एनआयएला असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी वाझे यांच्या केबिनमधून काही अत्यंत संवेदनशील दस्तऐवज एनअायएच्या हाती लागले. त्याशिवाय लॅपटॉप, आयपॅड आणि मोबाइलही जप्त करण्यात आला.

 

News English Summary: The NIA is said to have suspected that Sachin Vaze also staged the Antilia blast at the behest of Parambir Singh. On Tuesday, the NIA seized some highly sensitive documents from Sachin Vaze’s cabin. Laptops, iPads and mobiles were also seized.

News English Title: NIA will take big action after arrest of Sachin Vaze news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x