1 February 2023 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Union Budget 2023 | पोस्ट ऑफिसच्या दोन योजनांमध्ये गुंतवणुकीची मर्यादा दुप्पट, कोणत्या योजना पहा New Tax Regime Changes | टॅक्स पेयर्स लक्ष द्या, अन्यथा या एका चुकीमुळे तुम्हाला 7 लाखांपर्यंत सूट मिळणार नाही Budget 2023 Income Tax | नोकरदारांसाठी मोठी बातमी! अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये इतकी सूट दिल्याची घोषणा Union Budget 2023 | खुशखबर, महिलांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अर्थमंत्र्यांनी केली घोषणा LIC Whatsapp Services | खुशखबर! LIC संबंधित या सर्व सेवा आता व्हाट्सअँपवर ऑनलाईन मिळणार, असे कनेक्ट व्हा TCS Share Price | अर्थसंकल्पाच्या दिवशी तज्ज्ञांचा टीसीएस शेअर खरेदीचा सल्ला, मोठा परतावा देईल, कारण पहा Nykaa Share Price | नायका शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा
x

#IPL २०१९: मुंबई इंडियन्सची चेन्नईवर मात; जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले

Mumbai Indian, Chennai Super 11, IPL 2019

हैदराबाद : भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे चौथ्यांदा जेतेपद पटकावले. मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी एकूण १५० धावांचे आव्हान ठेवले होते. वॉटसनचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले. मुंबईने अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.

मुंबईच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पण कालांतराने त्यांनी ठराविक फरकाने फलंदाज गमावले. मात्र यावेळी अपवाद ठरला तो शेन वॉटसन. आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी न करू शकलेल्या वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना वॉटसनने अर्धशतक झळकावले. ही खेळी साकारताना वॉटसनला तब्बल तीनवेळा जीवदान मिळाले.

हॅशटॅग्स

#IPL2019(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x