14 December 2024 4:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

बाबरी मशिद होती आणि राहीलं असं ट्विट करत असदुद्दीन ओवेसी आक्रमक

Ayodhya Ram Mandir, Asaduddin Owaisi, Babari Masjid

नवी दिल्ली, ५ ऑगस्ट : आज अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या भूमीपूजन सोहळ्यात श्रीरामांच्या भव्य मंदिराच्या भूमीपूजनासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी सांगितलं की, राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी ४० किलो चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विटेचा उपयोग अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पायाभरणीसाठी करणार आहेत. दरम्यान, सोहळ्यानंतर ही वीट लॉकरमध्ये ठेवण्यात येणार आहे.

असं सांगितलं जात आहे की, महंत नृत्य गोपाळ दास यांनी मणि राम दास छावनी पीठ यांच्यातर्फे राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी ४० किलोची चांदीची विट दान म्हणून देण्यात आली आहे. महंत कमल नयन दास, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दासचे उत्तराधिकारी आहेत. मणि राम दास छावनी पीठ हे महंत नृत्य गोपाल दास यांचं निवास स्थान आहे. अयोध्येतील सर्व प्रमुख धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा याच ठिकाणाहून आखण्यात येते.

केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे.

दुसरीकडे, देशभरात या सोहळ्याची चर्चा होत असताना मुस्लिम लॉ बोर्डने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील यात उडी घेतलीय. बाबरी मशिद होती आणि राहीलं असे ट्वीट असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय. या ट्वीटनंतर युजर्सनी ओवेसींवर निशाणा साधलाय.

 

News English Summary: MIM chief Asaduddin Owaisi also jumped on the bandwagon. Asaduddin Owaisi tweeted that Babri Masjid was and remains. After this tweet, users targeted Owesi.

News English Title: Ayodhya Ram Mandir Asaduddin Owaisi tweet on Babari Masjid News Latest Updates.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x