12 December 2024 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

आणि रंजन गोगोईंसारख्या रामभक्तांमुळे राममंदिर उभारणीची पहिली कुदळ मारली जाईल - शिवसेना

Rambhakt Ranjan Gogoi, Ram Mandir Nirman, Ayodhya

मुंबई, २२ जुलै : येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत श्री राम मंदिर निर्माणासाठी भूमीपूजन सोहळा होत आहे. त्यापूर्वी बाबरी कटाचा खटला बरखास्त करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ‘सीबीआय चालवत असलेला हा खटला 5 ऑगस्टपूर्वी बरखास्त केला तर ती श्रीराम मंदिर निर्माणासाठी आहुती देणाऱ्यांसाठी श्रद्धांजली ठरेल’, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाला राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय गदारोळ पाहण्यास मिळत आहे. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शरद पवारांच्या एनओसीची गरज नाही, असं म्हणून टीका केली आहे. त्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून ‘रामायण’ या शिर्षकाखाली अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अग्रलेखातून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे.

रक्त, घाम व अश्रूंनी अयोध्येची भूमी तेव्हा चिंब भिजली. शरयू नदी कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली. अशा असंख्य रामभक्तांच्या त्यागातून राममंदिर भूमिपूजनाचा दिवस उजाडत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे आता राज्यसभेचे सदस्य आहेत, पण ते मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर विराजमान होते तेव्हा “अयोध्या रामाचीच! मंदिर तेथेच होईल” असा निर्णय त्यांनी दिला. त्यामुळे मंदिराच्या भूमिपूजनासाठी जी खास निमंत्रितांची यादी बनवली जाईल, त्यात खासदार रंजन गोगोई यांना मानाचे पान मिळायलाच हवे. लाखो कारसेवक, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटना आणि अलीकडे रंजन गोगोईंसारखे रामभक्त यांच्यामुळे अयोध्येत राममंदिर उभारणीची पहिली कुदळ मारली जाईल असं सामानाने खोचकपणे म्हटलं आहे.

 

News English Summary: Chief Justice of the Supreme Court Ranjan Gogoi is now a member of the Rajya Sabha, but when he was sitting on the Chief Justice’s chair, it was Ayodhya Rama! He decided that the temple would be there. Therefore, MP Ranjan Gogoi should be honored in the list of special invitees for the Bhumi Pujan of the temple.

News English Title: Rambhakt Ranjan Gogoi should get invitation for Ram Mandir Nirman News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x