22 October 2021 1:06 PM
अँप डाउनलोड

Sindhudurg Chipi Airport | राणे प्रोटोकॉलवरून स्वतःला 'सीनियर' म्हणाले | उदघाटनाला ज्योतिरादित्य ऑनलाईन झाले

Sindhudurg Chipi Airport

सिंधुदुर्ग, 0९ ऑक्टोबर | चिपी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वीच काल नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन चिपीचं सर्व श्रेय आमचं असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा चिपी विमानतळाशी काहीच संबंध नसल्याचं सांगितलं होतं. तसेच निमंत्रण पत्रिकेत बारीक अक्षरात नाव टाकल्याने नाराजी (Sindhudurg Chipi Airport) व्यक्त केली होती. तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचंही म्हटलं होतं. तसेच राणे पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्ये आपण सीनियर असल्याचं राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानामुळेच ज्योतिरादित्य शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

BhagyaVivah Marathi Matrimonial

Sindhudurg Chipi Airport: The much talked about Chippewa Airport in Sindhudurg will be inaugurated today. However, now Jyotiraditya Shinde will not be attending the event in person but will be appearing online :

दरम्यान, सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. या उद्घाटनाला नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. या सोहळ्यासाठी ठाकरे आणि शिंदे एकाच विमानातून जाणार असल्याची चर्चाही होती. मात्र, आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजेरी लावणार नसून ते ऑनलाईन हजेरी लावणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकटे पडल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच शिंदे येत नसल्याने या कार्यक्रमावर शिवसेनेचीच छाप पडणार असल्याचंही बोललं जात आहे.

या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात होतं. ठाकरे आणि शिंदे एकाच विमानातून आणि राणे दुसऱ्या विमानातून चिपीकडे जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण शिंदे यांनी अचानक कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचं सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा – TATA Sons Wins Air India Bid | एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sindhudurg Chipi Airport union aviation minister Jyotiraditya Scindia will present online for inauguration.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x