19 May 2024 8:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

शिंदे गटाविरोधात भाजपमध्ये सुप्त नाराजी | चंद्रकांतदादांनी खदखद व्यक्त केली, बंडखोरांना निवडणुकीत फटका बसणार?

Chandrakant Patil statement

Chandrakant Patil’s Statement | मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्याने शिंदे यांच्या विरोधातील सुप्त राग भाजपमध्ये अधोरेखोत झाला आहे. पनवेलमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत पाटील यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयावर सुद्धा नाराजी :
कार्यकारिणी बैठकीत बोलताना पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झाला. तो बदल होत असताना योग्य संदेश देईल अशा व्यक्तीची गरज होती. असं असतानाही आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वानं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयानं आपल्या सर्वांनाच दु:ख झालं. पण ते पचवून आपण पुढे गेलो’.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री पदानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. परंतु, केंद्रीय नेतृत्वाचा आदेश त्यांनी मान्य करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे.

दरम्यान पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद थेट दिल्लीत उमटल्याचं पाहायला मिळतंय. पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढण्याचे आदेश दिल्लीतून देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

भाजपमधील सुप्त नाराजी शिंदे गटातील आमदारांना निवडणुकीत भोवणार?
२०१९ मधील विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला खूप कमी जागा आल्या होत्या. त्यावेळी स्वतः उद्धव ठाकरे चर्चेत असताना देखील त्यांना अपेक्षे पेक्षा खूप कमी जागा देऊन दबावाचं राजकारण केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या एकूण जागांपैकी तब्बल ७० विधानसभा मतदारसंघात वरिष्ठांच्या अघोषित आदेशावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे काम केले होते हे देखील नंतर समोर आलं होतं. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्णपणे भाजपच्या हातातील बाहुलं झाले आहेत हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे २०२४ मध्ये शिंदे गटासोबत युती करून पडद्यामागून शतप्रतिशत साठी कामं केली जातील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिंदें हे झंझावात निर्माण करणारे नेते नाहीत आणि त्यांच्यात ती शैली सुद्धा नाही. त्यामुळे ते अनेकांना निवडून आणतील या राजकीय मृगजळात सध्या शिंदे गटातील आमदार हरवल्याचे राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत.

News Title: Chandrakant Patil statement against CM Eknath Shinde group check details 23 July 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x