12 December 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

TATA Sons Wins Air India Bid | एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात

TATA Sons Wins Air India Bid

मुंबई, 08 ऑक्टोबर | तब्बल ६८ वर्षांनंतर सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. Air India साठी पॅनलनं (TATA Sons Wins Air India Bid) टाटा समुहाची निवड केली. एअर इंडियासाठी टाटा समुह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. दरम्यान, टाटा समुहानं यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली होती.

TATA Sons Wins Air India Bid. Tata Sons has won the bid to acquire national carrier Air India on Friday. The salt-to-software conglomerate placed a winning bid of ₹ 18,000 crore re-acquire the airline more than half a century after it ceded control to the government :

यापूर्वी एअर इंडिया ही पुन्हा टाटा समुहाकडे जाणार या वृत्ताचं खंडन करण्यात आलं होतं परंतु अखेर यावर शिक्कामोर्तब झाला आहे. सरकारच्या निर्गुतवणूकीच्या कार्यक्रमाची जबाबदारी पाहणारे DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांनी एका पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

कर्जाच्या बोज्याखाली अडकलेल्या एअर इंडियाला विक्रीसाठी सुरू करण्यात आलेली बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. तसंच यावेळी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी यापूर्वी तारीख बदलली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा विकण्याची तयारी केली होती. परंतु त्यावेळी सरकारला कोणताही खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर सरकारनं कंपनीच्या पूर्णपणे विक्रीचा निर्णय घेतला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: TATA Sons Wins Air India Bid for 18 000 crore rupees.

हॅशटॅग्स

#TATA(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x