26 October 2021 5:40 AM
अँप डाउनलोड

युट्यूबवरील कोरोना संबंधित माहिती देणारे २५% पेक्षा अधिक व्हिडिओ फेक - संशोधन

Covid 19, fake Video, YouTube

नवी दिल्ली, १४ मे: कोरोनाचा जगाभोवतीचा विळखा अजून घट्टच झालेला दिसत असताना भारतात या विषाणूमुळे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या जीवघेण्या विषाणूनं आत्तापर्यंत भारतात २५४९ जणांचा मृत्यू झालाय. देशातील रुग्णसंख्या वाढून ही संख्या आता ७८,००३ वर पोहचलीय. यातील २६,२३५ रुग्ण बरे झालेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशात ३७२२ नवीन रुग्णांची भर तर १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्रात कोरोनाचे १६०२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या २७ हजार ५२४ इतकी झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ४४ जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. आज ५१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६ हजार ५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

जगभरातील सरकारी यंत्रणा सामान्य नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून अधिकृत सूचना देत आहेत. मात्र तरी देखील समाज माध्यमांवर लोकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ शेअर केले जातं आहेत. मात्र त्यात अजून अनेक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. कोरोनाचा धसका घेणाऱ्या सामान्य लोकांनी कोरोनाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी थेट युट्यूब’वर जाऊन त्याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक युट्युबर्स’नी स्वतःचा फॅनफॉलोवर्स वाढविण्यासाठी कोरोनाबाबत चुकीची माहिती देणारे व्हिडिओ युट्यूब’वर प्रसिद्ध केले. आजच्या घडीला कोरोना संबंधित हजारो व्हिडिओ युट्यूबवर शेअर करण्यात आले आहेत. मात्र त्यातील तब्बल २५ टाक्यांपेक्षा अधिक व्हिडिओ हे कोरोनाबाबत फेक माहिती देणारे असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

विशेष म्हणजे या संशोधनात असं देखील समोर आलं आहे की सरकारने आणि अधिकृत संस्थांनी युट्यूबवर अपलोड केलेल्या व्हिडिओला हजारात देखील पाहण्यात आलं नसून फेक व्हिडीओंना करोडो लोकांनी पाहिलं आहे. त्यामुळे जगभरात अनेक भ्रम पसरले असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आह. डेली मेलने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: More than a quarter of the most viewed English language COVID-19 videos on YouTube ‘contain fake or misleading information a study has revealed.

News English Title: More than QUARTER viewed COVID 19 videos YouTube contain fake misleading information News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x