5 June 2023 9:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

मजुर आणि शेतकऱ्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ९ मोठ्या घोषणा

FM Nirmala Sitharaman, Atmanirbhar Bharat

नवी दिल्ली, १४ मे : देशातल्या प्रत्येक राज्यात वन-नेशन वन रेशन कार्ड योजना लागू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातली घोषणा केली. या योजनेचा फायदा ६७ कोटी लोकांना फायदा होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ही योजना लागू झाल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही कार्ड धारकाला देशातल्या कोणत्याही रेशन दुकानातून रेशन घेण्याची मुभा असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रवासी मजुरांना पुढचे २ महिने मोफत धान्य दिलं जाणार आहे. रेशन कार्ड नसणाऱ्यांसाठी प्रत्येक व्यक्तीला ५ किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणाडाळ देण्यात येईल. याचा ८ कोटी मजूरांना फायदा होईल, तसंच यासाठी ३,५०० कोटी रुपये देत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं. वन नेशन वन रेशनकार्ड ही सुविधा ऑगस्ट २०२० पर्यंत सुरू करण्यात येणार आहे.

शेतकरी आणि मजुरांसाठी 9 मोठ्या घोषणा

  • सर्व स्थलांतरित मजुरांना दोन महिने मोफक धान्य मिळेल. 8 कोटी मजुरांना याचा फायदा मिळणार
  • रेशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ पहिल्यासारखं मिळेल.
  • रेशन कार्ड नसेल अशा स्थलांतरित मजुरांनासुद्धा 5 किलो तांदूळ आणि 1 किलो डाळ दिली जाईल. राज्य आपापल्या क्षेत्रातल्या मजुरांना ही मदत पोहोचवतील.
  • रस्त्यावर विक्री करणारे फेरीवाले, छोटे दुकानदार, टपरीवाले यांना कोरोनाकाळात नुकसान झाल्याने 5000 कोटींची मदत मिळेल. 50 लाख फेरीवाल्यांना मिळेल लाभ
  • डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मोठा फायदा मिळणार
  • शेतकऱ्यांना कर्जावरचं व्याज माफ होणार
  • 3 कोटी शेतकऱ्यांना 4.22 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यांना पुढचे सहा महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे.
  • 25 लाख नवी किसान क्रेडिट कार्ड लोन दिली गेली
  • आतापर्यंत मजूर आणि स्थलांतरित कामगारांसाठी 11000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली.
  • सहकारी आणि स्थानिक पतसंस्था आणि बँकांना मदत करणार. त्यासाठी 25,500 कोटींची तरतूद
  • राज्यांना पीकखरेदीसाठी 6700 कोटी दिले. मार्चमध्ये 4200 कोटी रुपयांचं ग्रामीण इन्फ्रा फंड देण्यात आला, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.
  • शहरातल्या गरिबांना मदत करण्याकरता 7200 बचत गट स्थापन करण्यात आले. संकटकाळात या बचतगटांच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझर निर्मिती झाली, असंही त्या म्हणाल्या.

 

News English Summary: Union Finance Minister Nirmala Sitharaman has announced that the One-Nation One Ration Card Scheme will be implemented in every state in the country. He made the announcement at a press conference here today. It has been clarified that the scheme will benefit 57 crore people. If the scheme is implemented, the National Food Security Act will allow any cardholder to buy rations from any ration shop in the country.

News English Title: Union Finance Minister Nirmala Sitharaman declared interest free loan for farmers free ration for migrants for next 2 months Atmanirbhar Bharat News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x