14 December 2024 2:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

देव माणूस नाराज; समाज माध्यमांवर रतन टाटांच्या नावे खोटा लेख पसरवला

Ratan tata, Covid19, Corona Crisis

मुंबई, ११ एप्रिल: टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले होतं. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी १५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं होतं.

आर्थिक मदत आणि जेवण अशी व्यवस्था केल्यानंतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स यांची टाटा समुहाच्या मुंबईतील ५ पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहण्याची सोय देखिल करण्यात आली आहे. कुलाबा येथील हॉटेल ताज महल पॅलेस, सांताक्रुजमधील ताज, द प्रेसिडेंट, अंधेरी एमआयडीसीतील जिंजर आणि बांद्र्यातील हॉटेल ताज लँण्ड्स एन्ड या हॉटेलमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडच्या प्रवक्त्यानं दिली होती.

मागील काही दिवसांपासून रतन टाटांच्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा मेसेज करोना व्हायरस संदर्भातील आहे. या पोस्टवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली असून ही पोस्ट आपण लिहली नसल्याचे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले. इतक नव्हे तर संबंधित पोस्ट कोणी लिहली त्याच शोध लावण्याची विनंती त्यांनी केली.

रतन टाटांनी आज एक पोस्ट त्यांच्या ट्विटवर शेअर केली. ते म्हणतात, खालील पोस्ट मी लिहली नाही किंवा तसे बोललो देखील नाही. मी तुम्हाला विनंती करतो की व्हाट्सअँप किंवा अन्य सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टची सत्यता तपासून पाहावी. मला काहीही सांगायचे असेल तर ते मी माझ्या अधिकृत चॅनलच्या माध्यमातून सांगतो. तुम्ही सर्व जण सुरक्षित असाल अशी अपेक्षा करतो. काळजी घ्या.

 

News English Summary: For the past few days, a message in the name of Ratan Tat has been going viral on social media. This message is from the Corona Virus reference. He expressed his displeasure with this post and had to clarify that you did not write this post. Not only that, he wrote a related post and requested to be researched. Ratan Tat shared a post on his tweet today. He says, I have not written the following post or said it. I urge you to check the authenticity of this post that goes viral on WhatsApp or other social media. If I have anything to say, I say it through my official channel. Hope you all are safe. Take care.

News English Title: Story Ratan Tata temper on this post said verify media circulated on Whatsapp and social platforms Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x