26 January 2022 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Zomato Share Price | दुप्पट कमाईसाठी स्वस्त झालेला झोमॅटो शेअर खरेदी करा | तज्ज्ञांचा सल्ला पहा Multibagger Penny Stock | 8 रुपयाच्या पेनी शेअरची कमाल | 400 टक्क्यांहून अधिक रिटर्न | सध्या मिळतोय स्वस्त Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

Fadnavis On MahaVikas Aghadi | ज्यादिवशी महाविकास आघाडी सरकार पडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही - फडणवीस

Fadnavis On MahaVikas Aghadi

मुंबई, 16 ऑक्टोबर | काल शिवसेनेचा दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार राजकीय प्रहार केले. विशेष म्हणजे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार भाजपने (Fadnavis On MahaVikas Aghadi) पाडून दाखवावंच असं थेट आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे.

Fadnavis On MahaVikas Aghadi. State Opposition Leader Devendra Fadnavis responded strongly to Shiv Sena chief Uddhav Thackeray’s challenge. Uddhav Thackeray says, overthrow the government, but you will never know when this will happen, warned Fadnavis :

दरम्यान, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे म्हणतात की, सरकार पाडून दाखवा, पण ज्यादिवशी हे घडेल तेव्हा तुम्हाला कळणारही नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

आज सकाळी त्यांनी मुंबईत प्रसारमध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘ सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे विचारांचं सोनं नव्हतं. तर ते मुख्यमंत्र्यांच नैराश्य (फ्रर्स्टट्रेशन) होतं. असंगाशी संग केलात की असंच होणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Fadnavis On MahaVikas Aghadi will collapse and  Uddhav Thackeray will never know when this will happen.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(680)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x