18 September 2021 10:47 PM
अँप डाउनलोड

महाभारत मालिकेतील इंद्रदेव आणि अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनामुळे निधन

Mahabharat, actor Satish Kaul

लुधियाना, १० एप्रिल: बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘महाभारत’मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी आणि पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून सतीश कौल यांची काळजी घेत असलेल्या सत्या देवी यांनी लुधियानाहून फोनवर या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या लुधियाना येथे केला जाणार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सतीश कौल यांनी सुमारे 300 हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम वेताळ’ या अतिशय लोकप्रिय मालिकांमध्ये ते वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसले होते. पण सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि आर्थिक संकटामध्ये सुरु होते. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये सतीश कौल यांना लुधियानाच्या एका छोट्या घरात राहणे भाग पडले. दर महिन्याला त्यांना घरभाडे आणि औषधांसाठी पैसे मिळावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

1969 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिकत असताना जया बहादुरी, डॅनी डेंगजोप्पा, आशा सचदेव, अनिल धवन हे त्यांचे बॅचमेट होते. शिक्षण संपल्यानंतर सतीश कौल यांना बर्‍याच पंजाबी चित्रपटात नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलंय, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. दिलीप कुमार, देव आनंद, विनोद खन्ना यांच्या सारख्या बॉलीवूड कलाकारांसोबत त्यांनी काम केले असले तरी. त्यांना बॉलिवूडमध्ये जी प्रसिद्धी मिळाली ती पंजाबी चित्रपटांतून मिळाली.

 

News English Summary: Hindi and Punjabi actor Satish Kaul, who played the role of Indra Deva in BR Chopra’s very popular ‘Mahabharat’, died due to corona. He was admitted to Shri Rama Charitable Trust Hospital in Ludhiana after he tested positive for corona a week ago. He was 72 years old.

News English Title: Mahabharat actor Satish Kaul died of corona in Ludhiana news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1403)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x