15 May 2021 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

MPSC Updates | त्या तीनही पदभरतीसाठी आता एकच संयुक्त पूर्वपरीक्षा

MPSC Board, MPSC Exams, Maharashtra Gazetted Technical Services, Joint Pre Examination

मुंबई, २० डिसेंबर: कोरोना काळात एमपीएससी परीक्षा घेण्यावरून प्रचंड अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे त्यात अजून भर पडली आणि राज्य सरकारवर भरती पुढे ढकलण्याची वेळ आली होती. सध्या राज्य सरकारने जाहीर केली महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाची भरती देखील प्रतीक्षेत आहे. एका बाजूला प्रचंड अडचणी असताना एमपीएससी बोर्ड सध्या उमेदवारांच्या भल्यासाठी परीक्षा प्रक्रियांमध्ये टप्याटप्याने काही सुसूत्रता आणत आहे. त्याबद्दलच एक महत्वाचा बदल समोर आला, ज्यामुळे एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) तांत्रिक सेवांच्या परीक्षा पद्धतीमध्ये महत्वाचा बदल केला असून, आता केवळ एका अर्जाद्वारे विद्यार्थ्यांना एकूण ३ संवर्गातील पदांसाठी पात्र परीक्षा देता येणं शक्य होणार आहे. त्याबदलानुसार एमपीएससीने महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गांसाठी स्वतंत्र परीक्षा न घेता आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार असून हा बदल २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीपासून केला जाणार आहे. (The Maharashtra Public Service Commission (MPSC) has made significant changes in the examination system of technical services and now it will be possible for students to appear for the examination for a total of 3 categories through a single application).

एमपीएससीने संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे (क्लिक करून आणि येथे वाचू शकता) ही माहिती सार्वजनिक केली आहे. महसूल आणि वन, कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील भरतीसाठी एमपीएससीकडू महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा यासाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जात होती. सदर संवर्गांच्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून स्वतंत्र अर्ज मागवून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जात होत्या.

परंतु, तीनही परीक्षांच्या आयोजनाबाबत विविध पैलूंचा विचार करून तीनही संवर्गातील भरतीसाठी आता ‘महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा’ (Maharashtra Gazetted Technical Services Joint Pre Examination) ही एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धत, पात्रता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षायोजना, अभ्यासक्रम आदी तपशील स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती एमपीएससीने दिली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल की मनस्ताप सहन करावा लागेल, हे येत्या काही दिवसांत कळेल.

संयुक्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ते एक, दोन किंवा तीनही परीक्षांना बसू इच्छितात का, या बाबतचा विकल्प घेतला जाईल. संबंधित परीक्षेसाठी उमेदवाराने दिलेले विकल्प हे संबंधित संवर्गातील परीक्षेसाठी अर्ज समजण्यात येतील. त्या आधारे, भरल्या जाणाऱ्या पदसंख्येच्या आधारे, संबंधित परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करायच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून प्रत्येक संवर्गासाठी पूर्व परीक्षेचे स्वतंत्र निकाल जाहीर केले जातील. पूर्वपरीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संवर्गासाठी संबंधित संवर्गासाठी एमपीएससीकडून प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमाच्या आधारे स्वतंत्र मुख्य परीक्षा घेतल्या जाईल. (Based on the results of the pre-examination, a separate main examination will be conducted for the eligible candidates on the basis of the examination scheme and syllabus published by the MPSC for each category).

 

News English Summary: Now, the only joint pre-examination will be ‘Maharashtra Gazetted Technical Services Joint Pre-Examination’. MPSC has informed that the details of method of accepting application, eligibility, age limit, fee, general selection process, examination plan, syllabus etc. for Maharashtra Gazetted Technical Services Joint Pre-Examination will be published separately. The decision will be a relief to the students and they will know in the coming days.

News English Title: MPSC Board updates over Maharashtra Gazetted Technical Services Joint Pre Examination news updates.

हॅशटॅग्स

#MPSC(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x