23 September 2021 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

त्यांच्या महिला पदाधिकारी षडयंत्र रचत असतील, ते आमचे संस्कार नाहीत | अखेर पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं - रुपाली चाकणकर

Rupali Chakankar

वर्धा, ०८ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं, असं सांगतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही, असा जोरदार हल्ला रुपाली चाकणकर यांनी चढवला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्यांच्या महिला पदाधिकारी षडयंत्र रचत असतील, ते आमचे संस्कार नाहीत, अखेर पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं – NCP leader Rupali Chakankar reaction on Pooja and Pankaj Tadas re marriage :

रुपाली चाकणकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 6 ऑक्टोबर 202 रोजी वैदिक विवाह मंगल कार्यालय या ठिकाणी पंकज आणि पूजाने नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्याकडे फक्त प्रमाणपत्रं होतं. वैदिक पद्धतीने त्यांनी विवाह केला नव्हता. म्हणून आज विवाह केला. गेल्या तीन चार वर्षापासून त्यांनी पूजाला विचित्रं वागणूक दिली आहे, तिला वेगवेगळी अमिषं दाखवून तिच्यावर अत्याचार केले. ही घटना समोर आल्यानंतर त्यांना विवाह करावा लागतोय, असं चाकणकर म्हणाल्या.

कोणतीही मुलगी स्वत:चा संसार किंवा स्वत:चं वैयक्तिक आयुष्य कधीच चव्हाट्यावर आणत नाही. तिने वर्धा पोलिसात तक्रार दाखल केली होती. केवळ राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. म्हणून नागपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यांच्या सर्व तक्रारी माझ्याकडे आहेत. विवाह प्रमाणपत्रंही माझ्याकडे आहे. तिला खूप त्रास होत होता म्हणून तिने व्हिडीओतून आपली वेदना मांडली. त्यामुळे त्यांना विवाह करावा लागतोय. यात सुपारी वगैरे घेण्याची आम्हाला भाजप सारखी सवय नाही. त्यांच्या महिला पदाधिकारी कदाचित अशा पद्धतीने षडयंत्र रचत असतील. आम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहोत. ते आमचे संस्कार नाहीत. ते भाजपचे संस्कार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Rupali Chakankar reaction on Pooja and Pankaj Tadas re marriage.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x