15 May 2021 1:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल

हरियाणा : हरयाणातील गुरुग्राम येथे गृहसंकूल व व्यापारी संकुले उभारण्यासाठी केलेल्या जमीन खरेदी प्रकरणात प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वड्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात ४२० हे कलम एफआयआर’मध्ये लावण्यात आलं आहे. त्याबरोबरच हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

एफआयआर’नुसार त्यात २ रियल इस्टेट कंपन्यांची सुद्धा नावे असल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित व्यवहारात वड्रा यांनी ५० कोटींचा लाभ झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. हरियाणातील विद्यमान भारतीय जनता पक्षाच्या सरकारने याआधीच संबंधित जमीनखरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एका आयोगाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रचाराचा हा महत्वाचा मुद्दा उचलून धरला होता.

दरम्यान या एफआयआर मध्ये वड्रा तसेच हुडा या दोघांसह स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफ या दोन कंपन्यांच्या संचालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात भारतीय दंड संहितेचे कलम ४२०, १२० ब, ४७६, ४६८ आणि ४७१ अन्वये वडेरा यांच्याविरुद्ध केस दाखल केली आहे.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x