26 September 2020 7:53 PM
अँप डाउनलोड

जोस बटलरच्या शतकी खेळीने इंग्लंड सुस्थितीत

साउदम्प्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंड संघाच्या तळाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना चांगलेच झुंजवले. त्यामुळे अखेर इंग्लंडने २३३ धावांची आघाडी घेण्यात यश मिळविले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

त्याआधी इंग्लंडने दुसऱ्या दिवसअखेर नाबाद सहा धावा केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात इंग्लंडने टीमने अॅलिस्टर कूक, मोईन अली आणि कीटन जेनिंग्स असे ३ गडी गमावले. पुन्हा उपहारानंतर इंग्लंडने चौथा फलंदाज गमावला. जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद झाला.

त्यानंतर कर्णधार जो रूटदेखील ४८ धावांवर धावचीत झाला. पण अखेर स्टोक्स-बटलर जोडीने दिवसभराचा डाव सावरला. त्यानंतर स्टोक्स आणि बटलर यांनी इंग्लंडला पावणेदोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. भारताने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(74)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x