25 April 2024 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

राज्यसभेत 8 विधेयके विरोधकांशी चर्चेशिवाय झाली मंजूर | संजय राऊतांकडून चिंता व्यक्त

Parliament monsoon session

मुंबई ०८ ऑगस्ट | संसदेच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात होऊन तीन आठवडे होत आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांचा पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईवरुन गदारोळ कायम आहे. परंतु, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यसभेत 8 विधेयके मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाज तासनतास तहकूब करावे लागत आहे. या आठवड्यात कामकाजामध्ये वाढ झाली असून 13.70% वरुन हे 24.20% आले आहे. आतापर्यंत सर्वात जास्त 32.20 टक्के काम पहिल्या आठवड्यात झाले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु झाले आहे. तिसऱ्या आठवड्यात गदारोळामुळे सभागृहाचे 21 तास 36 मिनीटे वाया गेली आहेत. राज्यसभेतील एका अधिकाऱ्याच्या मते, संसदेच्या तिसऱ्या आठवड्यात सभागृहात केवळ 22.60 टक्के काम झाले. ज्यामध्ये 8 विधेयके मंजूर करण्यात आली असून यासाठी 3 तास 25 मिनीट लागली आहे.

चर्चेशिवाय विधेयक झाले मंजूर झाल्याचा संजय राऊतांच्या आरोप:
दोन्ही सभागृहात सुरु असलेल्या गदारोळामुळे अनेक विधेयके चर्चेविना मंजूर झाली. हे निरोगी लोकशाहीसाठी चांगले नाही. सभागृहाच्या अध्यक्षांनीही वारंवार या सदस्यांना याची आठवण करुन दिली. परंतु, याचा काहीच परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील काही नेत्यांनी ही याचा विरोध केला होता.

सरकार जे बिल आणत आहे. त्याच्यावर आमच्या पक्षात देखील चर्चा झाली. एमएसईबी सारख्या ज्या कंपन्या आहेत. त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यांच्यावर राज्यांशी चर्चा झालेली नाही. कोणाशीही चर्चा न करता जर अशा प्रकारची विधेयक सरकार मंजूर करत असेल, तर यावर सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Parliament monsoon session Rajya Sabha ruckus three week news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x