30 April 2024 9:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

ओबीसी राजकीय आरक्षण | आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतोय अन्यथा...काय म्हणाले बावनकुळे?

Chandrashekhar Bawankule

मुंबई ०८ ऑगस्ट | भारतीय जनता पक्ष अपेक्षेप्रमाणे आता जातीय मुद्यांवर लक्ष केंद्रित करू लागल्याचं समोर येतंय. मराठा आरक्षणावरून १०२’वी घटना दुरुस्ती करून ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कायम ठेवून गुंता वाढवला आहे. तर दुसरीकडे राजकीय ओबीसींच्या आरक्षणावरून केवळ ‘ओबीसी आरक्षण’ हा शद्बप्रयोग करून संभ्रम वाढवत असल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना आरक्षण दिलंच पाहिजे. आम्ही आघाडी सरकारला डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देतो. आरक्षण दिलं नाही तर आघाडीच्या मंत्र्यांना गावांमध्ये फिरू देणार नाही, असा इशाराच भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी बोलताना हा इशारा दिला आहे. कायम केंद्राकडे बोट दाखवायच काम आता महाविकास आघाडीला करता येणार नाही. केंद्रानं आता राज्याला सर्वाधिकार होते, दिले आहेत आणि राहतील अशी व्यवस्था केलीय. फडणवीस सरकारनं आरक्षण दिल आणि टिकवूनही दाखवलं होतं. या सरकारला मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचचं नाहीये. आता जे विधेयक पास होईल त्यानंतरही जर दुर्लक्ष झालं तर आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगतानाच ओबीसी आरक्षणासाठी आम्ही महाविकास आघाडीला डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम देत आहोत. जर आरक्षण दिल नाही, समाजाला न्याय दिला नाही तर राज्यातल्या एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP leader Chandrashekhar Bawankule warn MahaVikas Aghadi govt over OBC reservation news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x