13 December 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

राज्य सरकार बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा करणार

Covid 19, Corona Crisis, construction workers

मुंबई, १८ एप्रिल : कोरोनाने घातलेले थैमान पाहता देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. संचारबंदी असल्याने उद्योगधंदे, कामगारांवर याचा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राज्यातील इमारत आणि इतर बांधकामे बंद झाली आहेत. बांधकाम कामगारांना काम नसल्याने दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता बांधकाम कामगारांना यातून दिलासा मिळणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे.

बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना दोन हजार रूपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून विभागाकडे जमा होत असतो. १ टक्का उपकर बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून वसुल केला जातो. याची ९ हजार ९०० कोटी रुपये शासनाकडे बांधकाम कल्याण मंडळात आहेत. या जमा झालेल्या उपकर निधीमधून कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. हा निधी कामगारांच्या सहाय्यासाठी वितरित येणार आहे.

 

News English Summary: The lockdown in the country has been extended until May 3, in view of the corps wearing corona. This has affected the industry and the workers due to the closure of communication. During the lockdown period, buildings and other structures in the state have closed. Construction workers do not get employment every day because they have no work. Therefore, they have to face many obstacles to meet the basic needs of daily life. But now the construction workers will be relieved. It has been decided to pay Rs 2,000 directly to the construction workers account.

News English Title: Story Maharashtra government to provide an assistance of rupees 2000 each to 12 Lakh registered construction workers Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x