28 March 2023 1:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का? Stocks To Buy | स्वस्त शेअर आश्चर्यकारक परतावा, किंमत 100 रुपयांपेक्षा ही कमी, अल्पावधीत मिळणार 60 टक्के परतावा, लिस्ट सेव्ह करा SIP Calculator | 1000 रुपयांच्या एसआयपीने 50 लाख मिळतील, एसआयपी कॅल्क्युलेटरने समजून घ्या फायदा New Tax Calculator | पगार वार्षिक 10 लाख रुपये, नवीन विरुद्ध जुनी टॅक्स व्यवस्था, किती टॅक्स भरावा लागेल पाहा PPF Calculator | जर PPF मध्ये दरमहा 10,000 रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला किती मोठी रक्कम मिळेल? गणना समजून घ्या ITR Filing 2023 | 1 एप्रिलपासून करदात्यांना ITR फाईल करता येणार, कोणते नवे फायदे मिळतील पहा SIP Calculator | स्वतःच 1 कोटींचं घर घ्यायचं असल्यास किती SIP करून शक्य होईल? फायद्याचं गणित समजून घ्या
x

दिल्लीतील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते | त्या नेत्यांनी त्यांचा काटा काढला

Shivsena, MP Vinayak Raut, Former CM Devendra Fadnavis

चिपळूण, ३ डिसेंबर: भारतीय जनता पक्षातील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी करत आहे. राज्यातील सत्ता हातातून गेल्याने त्यांचा प्रचंड जळफळाट झाला आहे. त्यामुळेच ते असे विकृत चाळे करत आहेत, अशा तिखट शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत (Shivsena MP Vinayak Raut) यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली.

दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको (The Bharatiya Janata Party leaders in Delhi did not want Fadnavis as the Chief Minister) होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप्यस्फोट त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोविडसारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम काम (The Mahavikas Aghadi government did a very good job in a crisis like Covid) केले. राज्यात जी आरोग्य व्यवस्था उभारली गेली आणि कोविडवर नियंत्रण मिळवले गेले. त्याची दखल जगाने घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामाचे कौतुक केले (Prime Minister Narendra Modi has also praised this work) आहे. कोविड काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असली तरी ठाकरे सरकारने त्यातून मार्ग काढत राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. लवकरच महाराष्ट्र पूर्वपदावर येईल, असेही ते म्हणाले.

 

News English Summary: Bharatiya Janata Party’s Devendra Fadnavis sponsored crooks are defaming Maharashtra and the Maharashtra government. With the loss of power in the state, they have suffered a huge loss. That is why they are making such perverted jokes, in such harsh words Shivsena MP Vinayak Raut criticized the Bharatiya Janata Party.

News English Title: Shivsena MP Vinayak Raut criticized former CM Devendra Fadnavis News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x