24 June 2019 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले पोटनिवडणूक: चंद्रपूर नगरपरिषदेत काँग्रेसचा भाजपाला दणका; पुण्यात भाजपचा आयात उमेदवार विजयी पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या? तर युतीमध्ये पुण्यात शिवसेनाला एकही जागा नाही, दानवेंच्या वक्तव्याने सेनेत संताप ५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?
x

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलींचा हिंसाचार, १५ जवान शहीद

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलींचा हिंसाचार, १५ जवान शहीद

गडचिरोली : गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ मोठा भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात तब्बल १५ जवान शहीद झाले असून या घटनेने महाराष्ट्र दिनी समस्त पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात पंधरा जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. घटनास्थळी नक्षली आणि पोलिसांची चकमक सुरु असल्याचे समजते.

मराठी विवाह II अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Maharashtra(11)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या