30 May 2023 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Calculator | PPF कॅल्क्युलेटर सांगेल 1000 गुंतवून 18 लाख परतावा कसा मिळवायचा, पैसा वाढवणारी माहिती  Loan Recovery Rules | आता तुमचे बॅंकेचे EMI थकले तरी डोन्टवरी, कर्जदाराला आरबीआयने दिलेले महत्वाचे अधिकार लक्षात ठेवा Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 45 रुपये गुंतवल्यास 25 लाख रुपये परतावा मिळेल, अधिक जाणून घ्या Multiple Bank Accounts | बँकेत एकापेक्षा जास्त अकाउंट्स असतील तर आधी ही खबरदारी घ्या, अन्यथा... Plan 475 | ममता-नितीश यांचा प्लॅन 475 काय आहे? 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या तर 209 जागांवर दुसऱ्या क्रमांकावर होते Triveni Engineering Share Price | मागील 5 दिवसात त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत, नेमके कारण काय? Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर स्टर्लिंग टूल्स शेअरचा गुंतवणूकदारांना 105% परतावा, आता 100% डिव्हीडंड देणार, स्टॉक डिटेल्स पहा
x

राज ठाकरे म्हणाले होते पक्ष वाढीवर कोण आडवा आला तर तुडवा त्याला... तेवढ्यात वसंत मोरे.. पहिला ह्याला!!

Vasant More

MNS Leader Vasant More | पुण्यातील सामान्य लोकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी जोडले गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात पुण्यातील वरिष्ठ नेत्यांचा गट कुरघोडीचे राजकारण करत असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. विशेष म्हणजे या नेत्यांचा सामान्य लोंकाशी तशी कोणतीही जवळीक नसून केवळ आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तिकीट वाटपातील व्यवहाराशी त्याचा संबंध असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी काहीही करून वसंत मोरे पक्षाबाहेर जातील अशी फिल्डिंग लावली गेल्याच वृत्त आहे.

त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांच्यासारख्या नेत्याला आपल्या गटात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मनसेत समाजाशी जोडल्या गेलेल्या नेत्यांना काही किंमत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. वसंत मोरे पडल्यास पुण्यात मनसे जवळपास निकामी झाल्यात जमा असेल. जे नेते मंडळी असतील ते स्वतःची राजकीय दुकानं चालवतील अशी टीका आता स्थानिक कार्यकर्ते करू लागले आहेत. सामान्य मनसे कार्यकर्त्यांचे तात्या कदाचित बाहेर पडले तर शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत बाहेर पडतील अशी शक्यता आहे.

दरम्यान, आज पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील एक प्रश्न थेट राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याशी संबधित होता आणि त्याचा थेट संबंध अशा प्रकारच्या घडामोडींशी होता. पत्रकारांनी वसंत मोरे यांना “पक्ष वाढीवर कोण आडवा आला तर तुडवा त्याला” या राज ठाकरेंच्या त्या विधानावरून प्रश्न विचारला असता त्यांनी इशारा करत पहिला ह्याला!! असं म्हणत पुढे स्वतःला सावरलं आणि तशी वेळ येणार नाही असं म्हणत इतर मुद्दे मांडले. तत्पूर्वी, तुमच्या विरोधात राजकारण करणारे ते पुण्यातील नेते कोण यावर वसंत मोरे यांनी थेट मनसे नेते बाबू वागस्कर यांचं नाव घेतलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Leader Vasant More could exit MNS after internal party politics check details on 05 December 2022.

हॅशटॅग्स

#Vasant More(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x